शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

कन्हाळगावच्या तीन किमी परिघात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 10:32 PM

कन्हाळगाव अभयारण्यात मध्य चांदा प्रादेशिक वन विभागाचे एकूण १८०२.०६५ हेक्टर व वनविकास महामंडळाचे २५१३८.१४६ हेक्टर असे एकंदरीत २६९४०. २११ हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. इको-सेन्सेटिव्ह झोनची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने यासंबंधी हरकती आणि सूचना मागविल्या. वन विभागाने नुकतीच जनसुनावणीही घेतली. एकदा हा सर्व परिसर इको-सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित झाला तर कडक नियम लागू होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्याच्या कन्हाळगाव अभयारण्यामुळे परिसरातील नागरिकांवर आधीच बंधने आली. आता इको सेन्सेटिव्ह झोन क्षेत्रावर अंतिम शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली वेगवान झाल्या. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी होऊ शकते. हे क्षेत्र सुमारे तीन किमीच्या परिघात राहणार असल्याने ४० गावांवर यापुढे कडक निर्बंध लागू होऊ शकतात.कन्हाळगाव अभयारण्यात मध्य चांदा प्रादेशिक वन विभागाचे एकूण १८०२.०६५ हेक्टर व वनविकास महामंडळाचे २५१३८.१४६ हेक्टर असे एकंदरीत २६९४०. २११ हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे. इको-सेन्सेटिव्ह झोनची पूर्वतयारी म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने यासंबंधी हरकती आणि सूचना मागविल्या. वन विभागाने नुकतीच जनसुनावणीही घेतली. एकदा हा सर्व परिसर इको-सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित झाला तर कडक नियम लागू होणार आहेत. त्यामुळे इको-सेन्सेटिव्ह झोनच्या परिघात सर्व प्रकारच्या कामांना मनाई करण्यात येणार आहे. कृषीपूरक लहान व्यवसायांचीही कोंडी होऊन परिसरातील स्थानिकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार भीती आहे. या परिसरातील अनेक गावे जंगलावर  निर्भर आहेत. त्यांची शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे अडचणी वाढण्याची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

संभाव्य संकटग्रस्त गावेइटोली- एक-दोन, निमगाटा चेक, मानोरा, निमगाटा मक्ता, कवडजई, केमारा, बहुतरी, देवई, चिंतलधाबा, करंजी, आक्सापूर, चेक बेरडी, चिवंडा, पाचगाव, परसोडी, कुडेसाव, कोठारी, हरणपायली, चक वडेगाव, वडेगाव, टोमटा, सोनापूर (दे.), काटवली, पोडसा, वामनपल्ली, लाठी, वेजगाव, सरांडी, धाबा, वटराना, चेक नांदगाव, चक गोजोली, दुबारपेठ चेक, चेक सोमपल्ली, कोंडाना, मंगलपेठ, गोजोली मक्ता, चक पाचगाव, चक दरूर, धामणगाव, चक तळोधी, भंगारपेठ, भंगाराम तळोधी, चक सुखवासी, डोंगरगाव माल, अडेगाव, कुडे नांदगाव, चेक बापूर, चेक डोंगरगाव.

तेंदूपत्ता संकलन यापुढे कायमचे बंद?

कोठारी, काटवली, बामणी,परसोडी, कुडेसावली, पाचगाव, कन्हारगाव, गणपूर, आक्सापूर, बेरडी, करंजी, भटारी, केमारा व देवई गावातील नागरिकांना दरवर्षी तेंदूपत्ता संकलनाचा मोठा आधार मिळतो. तो आता कायमचा बंद होऊ शकतो. यातून हजारो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. 

 

टॅग्स :forestजंगल