लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या मूल डेपोतून गोंडपिपरीमार्गे सकाळच्या सुमारास सोडली जाणारी बस नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने नांदगाव, गोवर्धनपासून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी अडचण होत आहे. नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच उशिराने बस येत असल्याने विद्यार्थिनींच्या अनेक तासिका बुडत असून मूल डेपो व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. त्यामुळे पालकवर्गांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.मूल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नांदगाव, गोवर्धन आणि गोंडपिपरी तालुक्यातील घोसरीपासून दिघोरी, कवठी, घाटकूळ, भिमणी, नवेगाव मोरे आदी गावातील अनेक मुले-मुली गोंडपिपरी येथील स्व. लक्ष्मणराव जगन्नाथजी कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय व इतर महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी सकाळची बसफेरी मूल डेपोतून गोंडपिपरीसाठी सोडली जाते. पूर्वी ही बस नियोजित वेळी मूलवरून सोडली जायची. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन ती ७ ते ७.२० वाजेपर्यंत गोंडपिपरीला पोहोचायची. त्यामुळे या सर्व गावाहून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाºया मुलींना सोईचे व्हायचे. सर्व तासिका त्यांना मिळायच्या. परंतु, चालू शैक्षणिक सत्रात ही बसफेरी नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने गोंडपिपरीला पोहोचायला विद्यार्थ्यांना कधी ८ वाजता तर कधी खूप उशीर होत आहे. परिणामी विद्यार्थिनींना महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नसून रोजच तासिका बुडत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून मूल डेपो व्यवस्थापनाला निवेदन देऊन सदर बस सकाळी लवकर सोडण्याची मागणी करण्यात आली. परंतु, डेपो व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थिनींची ही अडचण पाहता डेपो व्यवस्थापनाने सकाळची बसफेरी किमान ७.२० वाजतापर्यंत गोंडपिपरीला पोहोचेल, या बेताने मूलवरून सोडावी, अशी मागणी विद्यार्थिनी व पालकांनी केली आहे.विद्यार्थिनींना सुविधांचा लाभ द्यावासावित्रीच्या लेकींना शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी शासनाने मानव विकास मिशनअंतर्गत इयत्ता १२ वीपर्यंत मुलींना शिक्षणाच्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता मोफत बससेवेचा लाभ सुरू केला आहे. परंतु, मूल-गोंडपिपरी मार्गावर धावणाºया बसफेऱ्यांमधून या सेवेचा लाभ विद्यार्थिनींना दिला जात नसल्याच्याही अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना शिक्षण घेणे अवघड होत असून वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शासनाच्या धोरणानुसार इयत्ता १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना या सुविधेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
अनियमित बसफेरीमुळे शिक्षणाचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:02 PM
राज्य परिवहन महामंडळाच्या मूल डेपोतून गोंडपिपरीमार्गे सकाळच्या सुमारास सोडली जाणारी बस नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने नांदगाव, गोवर्धनपासून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी अडचण होत आहे. नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच उशिराने बस येत असल्याने विद्यार्थिनींच्या अनेक तासिका बुडत असून मूल डेपो व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. त्यामुळे पालकवर्गांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देडेपो व्यवस्थापनाचा अनागोंदी कारभार : मानव विकास योजनेपासून वंचित