फोटो: डोंगरहळदी शाळेची पाहणी करताना शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे.
चंद्रपूर : विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण तसेच बोलक्या भिंतीतून शिक्षण मिळावे तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडून ज्ञानकक्षा रुंदावाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतील आणि जिल्हा वार्षिक योजनेतील बाला पेंटिंगचे काम मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केले जात आहे. या कामामध्ये दर्जा तसेच सुसूत्रता यावी, यासाठी शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी शाळांनी भेटी देणे सुरू केले आहे. याअंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी जिल्हा परिषद शाळांना भेट देत त्यांनी पाहणी केली.
यावेळी शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता विजेंद्र वाडकर यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापक जे. डी. पोटे यांच्यासोबत चर्चा करून शाळेवर काढलेल्या पेंटिंगबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या पेंटिंगचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात होईल, असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी पोंभुर्णा आणि बल्हारपूर तालुक्यातील आष्टा, चिंतलधाभा, इटोलो आदी शाळांना भेटी देऊन कामाची पाहणी केली व तेथील मुख्याध्यापकांना मार्गदर्शक सूचना केल्या. त्यांच्या भेटीमुळे मुख्याध्यापकांनी या कामाला आणखीच गती दिली आहे.