लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीव्दारे संचालित वसतिगृहात आदिवासी विद्यार्थिंनीवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू असून, सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. दरम्यान, नुकतीच पीडित मुलींच्या पालकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह काही भाजपा आमदारांची चंद्रपुरात भेट घेतली. यावेळी अत्याचार झालेल्या मुलींचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नसून, त्यांच्या पुर्नवसनासाठी शासन प्रयत्नरत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.सोमवारी पीडिताचे पालक, उभोक्ता आणि मानव अधिकार सभा व आदिवासी समाजाच्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी अहीर यांची भेट घेतली. यावेळी आदिवासी विधीमंडळ अनु. जमाती कल्याण समितीचे प्रमुख आ. अशोक उईके, आ. राजू तोडसाम, आ. अॅड. संजय धोटे, आ. नाना श्यामकुळे, राहुल सराफ, आदिवासी नेते दयालाल कन्नाके, नगरसेविका ज्योती गेडाम, शीतल कुळमेथे यांची उपस्थिती होती.इन्फंट जिजस सोसायटीच्या संचालक मंडळाकडून मुलींची तपासणी खासगी रूग्णालयात करण्यासाठी दबाव आणला जात असून अन्य मुलीही आपपल्या घरी परतल्या आहे.संस्थेचे संचालक मंडळावर कारवाई करणे, तपासामध्ये पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई करणाºया दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत पीडित मुलींना न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी पीडित मुलींच्या पालकांनी केली. अत्याचारग्रस्त पीडितांच्या पालकांसह आदिवासी नेते वाघुजी गेडाम, अरूण मडावी, गणेश गेडाम, उपभोक्ता आणि मानव अधिकार सभेच्या मनिषा भाके, वंदना अंबादे, आरती आक्केवार, वसंत गजपुरे, अमृता गड्डमवार, प्रीती जकाते, वनमाला संजय परसुटकर, देवानंद ठाकरे, सचिन कोंडावार आदींची यावेळी उपस्थित होती.
पीडितांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:55 AM
राजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीव्दारे संचालित वसतिगृहात आदिवासी विद्यार्थिंनीवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू असून, सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर : पीडितांच्या कुटुंबीयांना आश्वासन