लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तोरगाव (खुर्द), तोरगाव (बु,) कोलारी, देऊळगाव येथील ४० विद्यार्थिनी ब्रह्मपुरी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु मानव विकास मिशन योजने अंतर्गत बस उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी एसटी जणू पांढरा हत्ती ठरला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांना दररोज स्वखर्चाने ब्रह्मपुरीत यावे लागत आहे. वेळेवर बस मिळाली नाही तर तासिका वाया जाते.१ जुलैपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली. तेव्हापासून तोरगाव (खुर्द), तोरगाव (बु,) कोलारी, देऊळगाव येथील विद्यार्थिनींची बसअभावी गैरसोय होत आहे. मुली साक्षर व्हाव्या, त्यांच्यातील शिक्षणाचे प्रमाण वाढावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मुलींना प्रोत्साहन म्हणून अनेक योजनांची घोषणा झाली. गावापासून तालुक्याच्या ठिकाणी व परगावी शिकणाऱ्या मुलींना घरापासून शाळेमध्ये जाण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत संबंधित गावांपर्यंत बस पाठविण्याची योजना आहे. मात्र ४० विद्यार्थिनी योजनेपासून वंचित असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य ममता कुंभारे यांनी दिली.अशी आहे योजनामागास तालुक्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढविणे आणि दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची आर्थिक उन्नती करणे, हा मानव विकास संकल्पनेचा उद्देश आहे. या निकषानुसारच तालुक्याची निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना १२ वीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी गाव ते शाळेपर्यंत मोफत बससेवा पुरविण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाची आहे. वाहन खरेदीसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला.
बसअभावी विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:06 PM
तोरगाव (खुर्द), तोरगाव (बु,) कोलारी, देऊळगाव येथील ४० विद्यार्थिनी ब्रह्मपुरी येथे शिक्षणासाठी येतात. परंतु मानव विकास मिशन योजने अंतर्गत बस उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी एसटी जणू पांढरा हत्ती ठरला. आर्थिक परिस्थिती नसतानाही त्यांना दररोज स्वखर्चाने ब्रह्मपुरीत यावे लागत आहे. वेळेवर बस मिळाली नाही तर तासिका वाया जाते.
ठळक मुद्देपालकांमध्ये नाराजी : मानव विकास योजनेची अंमलबजावणी करा