हेमराजसिंग राजपूत : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटनचंद्रपूर : रस्तासुरक्षेची माहिती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेसमोर मांडता येते. त्याच्याच सहय्याने रस्ता सुरक्षा प्रभावी होत असते. असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवारला वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथे आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस उपअधीक्षक (गृह) जयचंद्र काटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कुकडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी आदींची यावेळी उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना राजपूत पुढे म्हणाले, विद्यार्थी वर्गात किंवा वर्गाबाहेर जे शिकतात जे अनुभवतात ते कुटुंबात आणि मित्रांसमोर बोलतात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम यशस्वी होते. त्यामुळे रस्ता सुरक्षेत विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी घरी पालकांना, मित्रांना रस्ता सुरक्षेचे नियम सांगून त्यांना तसे आचरण करण्यास सांगावे, असा सल्ला राजपूत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांना व नातेवाईकांना हेल्मेट आणि सुरक्षेचे उपाय करूनच वाहने चालविण्यास बाध्ये करावे, असे सांगितले. आभार जयचंद्र काटे यांनी मानले. याप्रसंगी वाहतूक नियमांचे संदेश देणारे छायाचित्र प्रदर्शन येथील दालनात भरविण्यात आले होते. (नगर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमुळेच प्रभावी रस्ता सुरक्षा
By admin | Published: January 11, 2017 12:39 AM