लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरपना तालुक्यातील बैलमपूर येथील शेतशिवारात आठ ते दहा जनावरे जनावरे मृतावस्थेत आढळल्याची घटना आज ( दि. २६ ला ) सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. तसेच अनेक जनावरे विष बाधीत झाली असून त्याना धोका निर्माण झाला आहे.व्यंकटेश नारायण रा. गडचांदूर यांच्या शेतात जनावर चरण्याकरिता आले होते सकाळी ७ वाजताच्या दरम्यान अनिल आडे नावाचा शेतात काम करणारा मुलगा शेतामध्ये आला असता त्याला एक गाय मृतावस्थेत पडून दिसली. त्यानंतर त्याने शेतातील २५-३० गायींना बाहेर हाकलून दिले. बाहेर हाकलल्यानंतर दुसरीकडे जाता-जाता जवळपास सात ते आठ जनावरे दगावली असून आणखी अनेक जनावरांना विषबाधा झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.या घटनेमुळे शेतऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून त्वरित आर्थिक मोबदला देण्याची मागणी होत आहे. ज्यांच्या शेतात जनावरे चरत होती त्यांना जनावरांचा त्रास होत होता. त्यात शेतामध्ये विष टाकून ठेवल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. कारण ज्या क्षेत्रामध्ये जनावरे मरण पावली आहे याच क्षेत्रात जनावरांसाठी फक्त चारा होता. इतर ठिकाणी कुठेही चारा नसल्यामुळे याच शेतात विष टाकून जनावर मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा अंदाज लोकांकडून वर्तवला जात आहे.याबाबत तहसीलदार गाडे यांनी दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाला सूचना दिली. पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार विनोद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात विषबाधेमुळे आठ जनावरे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:12 AM
कोरपना तालुक्यातील बैलमपूर येथील शेतशिवारात आठ ते दहा जनावरे जनावरे मृतावस्थेत आढळल्याची घटना आज ( दि. २६ ला ) सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.
ठळक मुद्देघातपाताचा संशय