लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बुधवारी १६६ नवे बाधित पुढे आले आहेत. तर २१६ बाधितांना डिस्चार्ज करण्यात आले. कोरोना बाधितांची एकूण संख्या ११ हजार ४७२ झाली आहे. यापैकी आठ हजार ९९ कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून तीन हजार १९४ कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.याशिवाय बुधवारी जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७९ बाधितांचा मृत्यू झाला असून यात जिल्ह्यातील १७० बाधित आहेत. बुधवारी छोटा नागपूर, चंद्रपूर येथील ७० वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला.या बाधितेला ६ ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. तर, दुसरा मृत्यू सिंधी कॉलनी परिसर रामनगर, चंद्रपूर येथील ७० वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला २ ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता.तर, दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. जिल्ह्यात बुधवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ६५, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील ११, चिमूर-१३, मूल-१४, जिवती तालुक्यातील पाच, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच, नागभीड- सहा, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील १६, सावली तालुक्यातील पाच, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील १० तर नागपूर येथील एक असे एकूण १६६ बाधित पुढे आले आहे.ग्रामीण भागातील बाधित रूग्णबल्लारपूर तालुक्यातील रेल्वे वार्ड, विद्या नगर वार्ड, गौरक्षण वार्ड, साईबाबा वार्ड, बामणी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील पंचशील वार्ड, बामणवाडा, सोमनाथपूर वार्ड, मानोली, कढोली, म्हाडा कॉलनी परिसर, जवाहर नगर, सास्ती,धोपटाळा भागातून बाधीत पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील यात्रा वार्ड, आंबेडकर वार्ड, सलीम नगर, टेमुर्डा, गांधी वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कहाली, चौगान, मालडोंगरी, विद्यानगर, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील विस्लोन, जुना सुमठाणा, झिंगोजी वार्ड, सुरक्षा नगर, एकता नगर,किल्ला वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव, व्याहाड भागातून बाधित ठरले आहे.सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील डोंगरगाव, पेंढरी, मोहाडी, वसुंधरा कॉलनी परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील मोटेंगाव, नेताजी वार्ड, टिचर कॉलनी परिसर, राजीव गांधी नगर, नेहरू वार्ड, गुरुदेव नगर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मूल तालुक्यातील वार्ड नंबर एक, हेकाडी, राजोली, ताडाळा परिसरातून बाधित ठरले आहे.आतापर्यंत १७० जणांचा मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १७०, तेलंगणा एक, बुलढाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.चंद्रपूर परिसरातील बाधितचंद्रपूर शहरातील व परिसरातील दुर्गापूर, घुटकाळा वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, हॉस्पिटल वार्ड, प्रगती नगर, विद्यानगर, तुकूम, गिरणार चौक परिसर, भिवापूर वार्ड, इंदिरानगर, जलनगर वार्ड, बाबूपेठ, सरकार नगर, पठाणपुरा वार्ड, घुग्घुस, द्वारका नगरी, ओमकार नगर, हनुमान नगर, भानापेठ वार्ड, घंटाचौकी, बोर्डा, बापट नगर भागातून बाधित पुढे आले आहे.
जिल्ह्यातील आठ हजारांवर बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 5:00 AM
आतापर्यंत जिल्ह्यात १७९ बाधितांचा मृत्यू झाला असून यात जिल्ह्यातील १७० बाधित आहेत. बुधवारी छोटा नागपूर, चंद्रपूर येथील ७० वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला. या बाधितेला ६ ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. तर, दुसरा मृत्यू सिंधी कॉलनी परिसर रामनगर, चंद्रपूर येथील ७० वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे.
ठळक मुद्दे१६६ नवे बाधित तर २१६ डिस्चार्ज : दोन बाधितांचा मृत्यू, कोरोना संसर्गाचा गती मंदावतेय