लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : निवडणूक आयोगाकडून १0 मार्चला घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. आचार संहितेच्या अंमलबजावणीकरिता फिरते पथक, स्थिर सर्वेक्षण पथक तथा चित्रीकरण सर्वेक्षण पथक असे प्रत्येकी पाच पथक कार्यरत राहणार आहे. ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया कालावधीदरम्यान प्रत्येक गतिविधीवर निवडणूक विभागाची नजर राहणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.नामांकन पत्र भरण्याचा कालावधी १८ मार्च ते २५ मार्च, नामांकन पत्र पडताळणी २६ मार्चला तर नांमाकन वापस घेण्याचा दिवस २८ मार्च, २९ मार्च उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तर ११ एप्रिलला मतदान तर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील चिमूर विधानसभा क्षेत्रात ४३२ गावात ३0८ मतदान केंद्र, चिमूर तालुक्यात १४६ केंद्र, नागभीड तालुक्यात १२१ केंद्र तर ब्रम्हपुरी तालुक्यात ४१ मतदान केंद्राचा समावेश आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण दोन लाख ७२ हजार १७५ मतदार असून यात एक लाख ३३ हजार ४३५ स्त्रीया व एक लाख ३८ हजार ७४० पुरुष मतदार आहेत. नागाभीड तालुक्यातील केंद्र क्रंमाक १२७ चिमूर तालुक्यातील १७२, १७३ , १७६ व १७९ मतदान केंद्रात मतदार संख्या जादा असल्याने सहायकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव पाठविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी शेखरसिंग राहणार असल्याची माहिती दिली. यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, नायब तहसीलदार दरभे उपस्थित होते.३१ झोन अधिकाऱ्यांची नेमणूकभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बेल) निर्मित मॉडेल ३ चे प्रत्येक मतदान केंद्रात मतदान पडताडणी यंत्र (व्हीव्हीपॅट) वापरण्यात येणार आहे. ३१ झोन अधिकारी नेमण्यात येणार असून त्यांना या कालावधीत न्याय दंडाधिकाऱ्यांचे अधिकार राहणार आहेत. दृष्टीव्ंयगाकरिता यंत्रावरच ब्रेल लिपीतील पट्टी असणार आहे.
प्रत्येक घडामोडींवर निवडणूक विभागाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:13 PM
निवडणूक आयोगाकडून १0 मार्चला घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. आचार संहितेच्या अंमलबजावणीकरिता फिरते पथक, स्थिर सर्वेक्षण पथक तथा चित्रीकरण सर्वेक्षण पथक असे प्रत्येकी पाच पथक कार्यरत राहणार आहे.
ठळक मुद्देभैयासाहेब बेहरे : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर