शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

१२ बाजार समित्यांची निवडणूक : आघाडीत राष्ट्रवादीला डच्चू, काँग्रेसचे भाजपशी संधान!

By राजेश मडावी | Published: April 22, 2023 2:51 PM

सहकारातील सत्तेसाठी एकमेकांविरूद्ध कुरघोडी

चंद्रपूर : जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन टप्प्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येकी १८ प्रमाणे २१६ संचालकपदासाठी ४७६ उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची चिन्हे असली तरी काही ठिकाणी भाजपा व काँग्रेस अशी मैत्री होऊन महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीला डच्चू देण्यात आला; तर कुठे काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, शेतकरी संघटन, भाजपा, काँग्रेस व शिवसेना अशी युतीही जन्माला आली आहे. 

नागभीड येथील बाजार समितीसाठी ३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांतच लढती यंदा लढत होणार आहे. पोंभूर्णा बाजार समितीत ४०, वरोरा ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या बाजार समितीवरील बहुतांश माजी संचालक, सभापती, उपसभापती काँग्रेस समर्थक असल्याने भाजपाच्या तुलनेत काँग्रेसचे पारडे जड आहे. ब्रम्हपुरी ३९, सिंदेवाही ३६, राजुरा ३७, कोरपना ५२, मूल ३१, चंद्रपूर ४३, भद्रावती ३९, चिमूर ३६ व गोंडपिपरी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

पक्षनिष्ठा बाजूला ठेवून विरोधकांशी हातमिळवणी

मूल बाजार समितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत गटाचे वर्चस्व आहे. येथे खासदार बाळू धानोरकर व  रावत हे काँग्रेसचे दोन नेते एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. ब्रम्हपुरीत माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार व भाजपने मैत्री केली. चंद्रपूर समितीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे एकत्र आले. या दोघांनी बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांच्याविरूद्ध आघाडी उघडली. राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी उमेदवार उभे करून ताकद पणाला लावली आहे.

दोन संघात सर्वाधिक उमेदवार

जय- पराजयाचे गणित ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकार व ग्रामपंचायत मतदार संघातच सर्वाधिक मतदार आहेत. त्यातच उमेदवारांचीही संख्या वाढली. सहकारमधून २८४ तर ग्रामपंचायत संघातून १०३, व्यापारी ५८० हमाल मापारी ३१ असे एकूण ४७४ उमेदवार भविष्य आजमावित आहेत.

कुणाला कपबशी तर कुणाला बॅट, किटली !

गोंडपिपरी, भद्रावती, पोंभुर्णा येथे ३० एप्रिल तर ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड, राजुरा, कोरपना, मूल, चंद्रपूर, चिमूर, सिंदेवाही येथे २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. शुक्रवारी २१ एप्रिलला उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप झाले. यात कपबशी बॅटपासून तर गिटार, किटलीपर्यंत २५ पेक्षा अधिक चिन्हांचा समावेश आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्डchandrapur-acचंद्रपूर