लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विधानसभा निवडणुकांचे वेध आता सर्वांना लागले आहे. यामुळे जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघालेले आहे. असे असताना शेतकरी मात्र मोठया अडचणीच्या स्थितीत आहे. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आले होते. त्यांना त्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र प्रशासन आता निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.उंबरठयावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकारणी, प्रशासन यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे एका बाजूला ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कमी पावसाअभावी दुष्काळ, अशी अवस्था आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. शेतात दोन वर्षांपासून पिके मनासारखी झालेली नसल्यामुळे शेतकºयांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पीक आणि इतर कर्ज पुन्हा थकीत असल्याने शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा दणका सुरू होईल. दुष्काळी अवस्थेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गणशोत्सव काळात पाऊस उसंत घेईल, या आशेवर शेतकरी होते; परंतु आतापर्यंत तरी जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची उघड झाप सुरूच आहे. आता नवरात्रीत पाऊस जाईल या आशेवर शेतकरी आहेत. त्या वेळीही पाऊस न गेल्यास कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना अतिशय अडचणीची अवस्था निर्माण झाली आहे. शेती-शेतकरी अडचणीत आला आहे. अशावेळी निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्याने आता हे सर्व प्रश्न मागे पडल्यासारखे झाले असून आता निवडणुकांच्या चर्चेत लोक, तर डावपेचात राजकारणी रंगू लागले आहेत. आता प्रत्येक समस्येला नेत्यांकडे एकच उत्तर ‘निवडणुकी नंतर पाहू’असे झाले आहे.ग्रामीण भागातही चर्चा रंगू लागल्याग्रामीण भागातील वातावरणात राजकारणाचे रंग भरू लागले आहे. शेतकरी सोडून इतर मंडळी विधानसभा निवडणुकीचे वेध घेऊ लागले आहेत. मतदार याद्या आणि निवडणुकांच्या इतर कामात प्रशासन आतापासूनच गुंतले गेल्याने ओला दुष्काळ उपाययोजनांचे काय होणार, हो मोठा प्रश्न आहे. निवडणुकीच्या कामाबरोबरच दुष्काळ निवारणाच्या कामाकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.पोलीसही लागले तयारीलानिवडणुकांचा ज्वर जसा वाढू लागला तसे कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. निवडणुकीचे वातावरण यावेळी अत्यंत चुरशीचे असल्याने गावोगावी राजकीय गट चांगलेच सक्रिय झाल्याने कुठेही, केव्हाही तणाव निर्माण होऊ शकतो, अशी स्थिती आहे. पोलिसांनी याचा अंदाज घेऊन आतापासूनच तयारी सुरू केली आहे. निवडणुकांची चाहूल लागताच ‘सोशल मीडिया’वरील वाचाळवीर चेकाळले आहेत, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे.
सर्वांना आता निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:00 AM
उंबरठयावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकारणी, प्रशासन यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे एका बाजूला ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कमी पावसाअभावी दुष्काळ, अशी अवस्था आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी करावे काय? : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून प्रशासन निवडणुकीत