लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर तालुक्याचे विभाजन करून आगामी विधान सभेच्या निवडणुकांपूर्वी कोठारी तालुक्याची निर्मिती होणार आहे, असे आश्वासन राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोठारी येथील जनता विद्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात दिले.कोठारी येथे नवीन पाणीपुरवठा योजना मंजुर करून त्याचे रितसर लोकार्पण सोहळा ४ नोव्हेंबरला होणार होता. मात्र आचारसंहीतेमुळे सदर कार्यक्रम रद्द झाला. परंतु आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला असून बल्लारपूर तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्याच्या उद्देशाने कोठारीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना व उपस्थित जनतेला संबोधित करताना ना. मुनगंटीवार यांनी ग्रामीण तथा शहरी भागात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.मेळाव्याला बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, प्रमोद कडू, राजु तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. गावाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असून जनतेनी दिलेल्या संधीचा जनतेच्या विकासासाठी पुरेपूर उपयोग करणार असल्याचे सांगत बामणी-कोठारी-गोंडपिपरी-आष्टी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग मंजुर झाला असून त्याचे लवकरच काम सुरू होणार आहे. पळसगाव-आमडी जलसिंचन योजनेच्या पूर्णत्वासाठी निधीची कमतरता पडू देणार नसून या भागात भाजीपाला क्लस्टर तयार करण्याचा मानस व्यक्त केला. जनतेच्या समोर जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपली शक्ती खर्च करीत आहे. जिल्हाभरात ग्रामीण गावखेड्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या असून त्यापासून जनतेला अनेक रोगांचा सामोर जावे लागत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील सार्वजनीक ठिकाणी शुध्द पाण्यासाठी आर.ओ.ची योजना लवकरच अंमलात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.बल्लारपूर तालुक्यातील कोठारी गाव मोठे असून येथील जनतेचे तालुक्यासाठी मागील २० वर्षापासून संघर्ष सुरू आहे. मागील निवडणुकीत गावकºयांना कोठारी तालुका निर्माण करून देण्याचे वचन दिले होते. त्या अनुषंगाने शासनस्तरावर काम सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोठारी तालुक्याची निर्मिती होणारच असे ठासून सांगितले. मात्र गावकºयांनी विकास कामासाठी प्रयत्न करणाºया कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहीजे. त्यामुळे पुन्हा जोमाने विकासकामे करण्यास बळ प्राप्त होते, असे ते म्हणाले.भारतीय जनता पार्टी शाखा कोठारीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा जनता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर सत्ता स्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.यशस्वीतेसाठी प.स. सभापती गोविंदा पोडे, उपसभापती इंदीरा पिपरे, जि.प.सदस्य वैशाली बुध्दलवार, हरिष गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार, किशारे पंदीलवार, अनिल टिपले, मोरेश्वर उदीसे, ज्ञानेश्वर लोहे, रमेश पिपरे, शोभा वडघणे, विनायक कोसरे, आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन रमेश पिपरे व आभार सुनिल फ रकडे यांनी केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
निवडणुकीपूर्वी कोठारी तालुका निर्मिती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 11:36 PM
बल्लारपूर तालुक्याचे विभाजन करून आगामी विधान सभेच्या निवडणुकांपूर्वी कोठारी तालुक्याची निर्मिती होणार आहे, असे आश्वासन राज्याचे अर्थ नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी .....
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे सुतोवाच : विकास कामांना जनपाठिंब्याची गरज