लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे भगवान येशु यांच्या जन्मदिवस चंद्रपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रिसमसनिमित्त शहरातील सेंट एंड्रयु चर्चसह सर्व चर्च विद्युत रोषणाईने सजवले आहे. शहरातील अनेक चर्चमध्ये सोमवारच्या रात्रीपासूनच विविध कार्यक्रमाद्वारे भगवान येशुचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.मंगळवारी ख्रिश्चन समाज बांधवानी ने सेंट एंड्रयु चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करीत भगवान येशुला देशात शांती व सद्भावनेसाठी प्रार्थना केली. सामूहिक प्रार्थनानंतर फॉदर वी. एस. घाटे यांनी बायबल ग्रंथाच्या साह्याने समाजाबांधवाला ईश्वराचा संदेश दिला. फॉदर वी. एस. घाटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, ख्रिश्चन बांधवासाठी हा दिवस अंत्यत महत्त्वाचा असतो. ख्रिसमसनिमित्त चर्चमध्ये विशेष पार्थना करण्यात आली. समाजातील युवकांंनी विविध रंगाच्या पताक्यांनी संपूर्ण चर्च सजविले. तसेच सामूहिक प्रार्थनासोबत विविध धार्मिक गाण्याद्वारे ईश्वराची आराधना केली.ख्रिसमसनिमित्त सेंट एंड्रयु चर्चमध्ये बुधवारापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.सांताक्लॉज व एक्समस ट्रीचा केककेक कापून ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे केकला विशेष मागणी असते. त्यामुळे शहरातील सर्व बेकरीमध्ये विविध प्रकारचे केक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. तर खरेदीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. चंद्रपुरातील एका बेकरीमध्ये प्रदिप मंडल यांनी सांताक्लॉज व एक्समस ट्रीच्या आकाराचा केक तयार केला असून त्याला ग्राहकांची विशेष मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्युत रोषणाईने सजले चर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:16 PM
जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे भगवान येशु यांच्या जन्मदिवस चंद्रपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रिसमसनिमित्त शहरातील सेंट एंड्रयु चर्चसह सर्व चर्च विद्युत रोषणाईने सजवले आहे. शहरातील अनेक चर्चमध्ये सोमवारच्या रात्रीपासूनच विविध कार्यक्रमाद्वारे भगवान येशुचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देख्रिसमसनिमित्त विविध कार्यक्रम : शांतीसाठी भगवान येशुकडे प्रार्थना