शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
3
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
4
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
5
वर्षभरात अर्धी होतेय Smarphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
6
फिल्मी क्विनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
7
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
8
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
9
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
10
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
11
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
12
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
13
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
14
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
15
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
16
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
17
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
18
'ही' आहे भारतीय रेल्वेची सर्वात स्वच्छ ट्रेन, तिकिटांसाठी आधीच होतंय बुकिंग
19
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
20
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड

सार्वजनिक गणेश मंडळांना वीजदरात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:48 PM

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज मीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.

ठळक मुद्देचाहुल श्रीची : अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज मीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवाकरिता तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये२० पैसे अधिक १ रुपया १८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे ४ रुपये ३८ पैसेप्रती युनिट असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त १३ पैशांनी अधिक आहे, तर वाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९० पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिकउत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठाघ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आलेला आहे.गणेश मंडळांनी सावधानता बाळगावीसार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो.याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्सलूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीज पुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणिजनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाचन् यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहनमहावितरणने केले आहे. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी २४ तास सुरु असणारे टोल फ्री १९१२,१८००१०२३४३५ वा १८००२३३३४३५ हे टोलफ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.