लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप, तेल पंप, एचडीपी पाईप पुरविणे यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या योजनेचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर हा निधी महावितरणकडे सोपविला जाणार आहे.अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना कृषी पंपाचे ऊर्जाकरण करणे यासाठी पुनविनयोजनाने उपलब्ध करुन देण्याकरिता अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप, तेल पंप, एचडी पाईपचा पुरवठा करणाऱ्या सुधारित आदिवासी उपाययोजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत समावेश करण्यात आला आहे. सदर कृषी वीज पंपांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता १८८.९३ कोटी रुपये खर्चुन उच्च दाब वितरण प्रणाली तयार करण्यात आली आहे. योजनेनुसार प्रति ग्राहक अडीच लाख रुपये इतका निधी अनुसूचित जमातीच्या कृषी वीज पंप ग्राहकास कृषीपंपचे ऊर्जीकरण करण्याकरिता शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महावितरणला निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहे. पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या अनुसूचित जमातीतील कृषी पंप ग्राहकांच्या एकूण संख्येला अनुसरुन प्रति ग्राहक अडीच लाख रुपये याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे.अनुसूचित जमातीमधील ज्या शेतकºयांनी २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत रक्कम भरुन प्रलंबित आहे, अशा शेतकºयांची यादी तातडीने सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 11:50 PM
अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वीज पंप, तेल पंप, एचडीपी पाईप पुरविणे यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या योजनेचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देदिलासा : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना