राष्ट्रीय हत्तीरोग मोहीम सुरू झाली असून राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. दोन वर्षांवरील लोकांना प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालण्याचा आणि हत्तीरोगावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे केला जात आहे.
कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीष गाडे, गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, नायब तहसीलदार गांगुर्डे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे, राम इंगळे, मलेरिया पर्यवेक्षक प्रदीप हंबर्डे उपस्थित होते.
राजुरा तालुक्यात या मोहिमेद्वारे शहरी भागातील ३० हजार ११ आणि ग्रामीण भागातील ९८ हजार ६८१ अशा एकूण १ लाख २८ हजार ६९२ जणांना त्यांच्या घरी जाऊन या गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. याकरिता शहरी भागात २० व ग्रामीण भागात १८२ पथके तयार करण्यात आल्याची माहिती राजुरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे यांनी दिली.