वरोरा : अपंगत्व निर्माण होण्यास हत्तीरोग हे दुसरे महत्त्वाचे कारण मानले जात असून, शारीरिक विकृतीतून विद्रुपीकरण करणारा हा रोग लोकसहभागातून हद्दपार करणे शक्य आहे. त्यामुळे सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी येथे केले.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम समारंभात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मुंजणकर, तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश उपस्थित होते.
तहसीलदार बेडसे, सुभाष शिंदे, डॉ. अंकुश राठोड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. बाळू मुंजणकर यांनी हत्तीरोग व सामुदायिक औषधोपचार मोहिमेबाबत नेटके विवेचन केले. यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे, डॉ. अंकुश राठोड, डॉ. बाळू मुंजणकर, पत्रकार राजेंद्र मर्दाने, प्रवीण गंधारे यांनी बाऊल मेथडचा वापर करून आयवरमेक्टीन, डी.ई.सी., व अलबेंडाझॉल गोळ्यांचे प्रत्यक्ष सेवन केले. कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, ग्रामपंचायत सरपंच यशोदा खामनकर, सदस्य राजू मिश्रा, राहुल ठेंगणे, पत्रकार प्रवीण खिरटकर, चेतन लुतडे, सारथी ठाकूर, चेतना शेटे उपस्थित होते.
090721\img-20210702-wa0114.jpg
image