आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आॅफ शिकागो येथे स्थापित अनेक देशांतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतात कार्य करणारी एपिक इंडिया आणि स्थानिक ग्रीन प्लॉनेट सोसायटीच्या संयुक्त प्रयत्नातून वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार आहे़महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवर स्टार रेटिंग प्रोग्राम राबविण्यात येणारी देशातील ही पहिलीच योजना असून त्यासाठी चंद्रपूरची निवड करण्यात आली आहे. मोहिमेची सुरुवात रविवारी स्थानिक बजाज पॉलिटेक्नीक येथून झाली़ चंद्रपूरचे प्रदूषण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले़प्रा. सुरेश चोपणे यांनी घरगुती कोळसा, कचरा जाळण्यामुळे पर्यावरण व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आदी विषयांवर तसेच एपिक इंडियाचे समन्वयक इशान चौधरी यांनी औद्योगिक प्रदूषण आणि स्टार रेटिंग प्रोग्राम यावर माहिती दिली. एपिक इंडियाचे दिल्ली येथील सहाय्यक संचालक आशिर्वाद सहा यांनी प्रदूषणाच्या विविध पैलुंवर विचार मांडले़ माहितीपट तयार करणारे सत्यजित शर्मा, पॉलिटेक्नीक कॉलेजचे कार्यकारी प्राचार्य सुनील चिंतलवार, प्रा. सुरेश विधाते, प्रा. प्रियंका सिंग, प्रा. गुंडावार, महेंद्र राळे आणि पर्यावरण शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. एपिक इंडियाच्या वतीने जिल्ह्यातील प्रदूषित क्षेत्रात ग्रामीण नागरिक, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांचा एक लघुपट तयार करण्यात आला़ स्टार रेटिंग प्रोग्राम हे मॉडेल वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी तयार केलेला देशातील पहिलाच उपक्रम आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर स्टार रेटिंग प्रोग्राम असा मेनू येतो़ यात महाराष्ट्रातील २० हजार धुराड्यांतील हवेच्या गुणवत्तेची माहिती उपलब्ध आहे.कमी प्रदूषण करणाºया उद्योगांना ५ स्टॉर तर जास्त प्रदूषण करणाºया उद्योगांना १ ते ४ स्टॉर असा क्रम देण्यात आला आहे. नागरिकांनी परिसरातील उद्योगांची क्रमवारी पाहून संबंधित तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उद्योगाकडे करावी, असा या संस्थेचा उद्देश आहे. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी एपिक इंडियाने घेतली आहे. चंद्रपूर आणि महाराष्ट्रात या मोहिमेसाठी ग्रीन प्लॉनेट सोसायटीने सहाय्यक संस्था म्हणून एपिक इंडियाशी करार केला आहे. यापुढे वर्षभर विविध उपक्रमांद्वारे जनजागरण आणि प्रत्यक्षात कामे केली जाणार आहेत, अशी माहिती ग्रीन प्लानेट संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे आणि इशान चौधरी यांनी दिली.
चंद्रपुरातील प्रदूषण दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:27 PM
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आॅफ शिकागो येथे स्थापित अनेक देशांतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतात कार्य करणारी एपिक इंडिया आणि स्थानिक ग्रीन प्लॉनेट सोसायटीच्या संयुक्त प्रयत्नातून वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार आहे़
ठळक मुद्देवर्षभर जागृती : विदेशातील संघटनांचा पुढाकार