चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश सोमवारी धडकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सत्राच्या मधातच बदल्या झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे किमान यावर्षासाठी तरी बदल्या रद्द कराव्या, अशी मागणी कर्मचारी करीत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या उन्हाळ्यात किंवा जुन महिन्यात अनेकवेळा होतात. बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घेतल्या जाते. विशेष म्हणजे, अनेक कर्मचाऱ्यांचे पाल्य शाळा, महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. आता सत्राच्या मध्यातच बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी फजीती होणार आहे. काही कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली होती. या कर्मचाऱ्यांचा कुठेही विचार न करता उलट त्यांची दूरवर बदली केली आहे. तर काही कर्मचाऱ्यांची मागील वर्षीच बदली झाली असतानाही त्यांचीही यावेळी बदली करण्यात आली आहे.उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बदली झाली असती तर, पाल्यांचा दाखला सोयीनुसार घेता आला असता, आता मात्र पाल्य एकीकडे आणि पालक दुसरीकडे अशी अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे किमान यावर्षीसाठी बदली रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)
अचानक बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांत संताप
By admin | Published: August 25, 2014 11:54 PM