चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसकडून 'इमोशनल कार्ड'; अर्ज भरण्याआधीच मुनगंटीवारांनी जनतेला केलं 'अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:12 PM2024-03-26T16:12:38+5:302024-03-26T16:15:20+5:30

Chandrapur Lok Sabha: दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिल्याने त्यांना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Emotional card from Congress on Chandrapur seat sudhir Mungantiwar gave alert to the public | चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसकडून 'इमोशनल कार्ड'; अर्ज भरण्याआधीच मुनगंटीवारांनी जनतेला केलं 'अलर्ट'

चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसकडून 'इमोशनल कार्ड'; अर्ज भरण्याआधीच मुनगंटीवारांनी जनतेला केलं 'अलर्ट'

BJP Sudhir Mungantiwar ( Marathi News ) : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघात यंदा भाजपने राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलं असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार याच चंद्रपुरातून निवडून आला होता. चंद्रपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता. मात्र मागील वर्षी बाळू धानोरकर यांचं निधन झालं. आता बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिल्याने त्यांना मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज सुधीर मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी घेतलेल्या सभेत मतदारांना भावनिक न होता मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात जनतेला आवाहन करत म्हटलं की, "तुम्ही यंदाच्या निवडणुकीत विकासावर मतदान न करता सहानुभूतीतून मतदान कराल तर मी तुम्हाला खबरदार करतोय, डोळ्यांतील अश्रू पाहून मतदान केलं तर चार वर्ष ११ महिने २९ दिवस २३ तास ५९ मिनिटे तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नंतर तुम्हालाच तुमची सहानुभूती करावी लागेल," असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला आहे.

दरम्यान, "राजकारणात निवडणुका या विकासावर झाल्या पाहिजेत, तुमचीही राज्यात सत्ता होती, तुम्ही खासदार होता, तेव्हा काय कामे केली हे जनतेला सांगा," असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवारांसाठी ऐतिहासिक निवडणूक

सुधीर मुनगंटीवार यांनी १९८९ मध्ये महाविद्यालयामध्ये विद्यार्थी असताना पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती. ते दुसऱ्या निवडणुकीला १९९१ मध्ये सामोरे गेले. पण साधारणतः १९९५ पासून आतापर्यंत त्यांनी चंद्रपूर विधानसभेतून तीनदा आणि तीनदा बल्लारशा विधानसभेचे नेतृत्व केले. ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना यश येणार की काँग्रेस उमेदवार मात देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Emotional card from Congress on Chandrapur seat sudhir Mungantiwar gave alert to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.