लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : शासनाने बंद केलेली जुनी पेन्शन योजना नव्याने सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शेकडो शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.महाराष्ट्र शासनाच्या सेवेत ३१ आॅक्टोबर २००५ पासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम (निवृत्तीवेतन) १९८२ व १९८४ (अंशराशिकरण) या अंतर्गत असलेली पेंशन योजना बंद करुन नवीन परिभाषीत अंशदायी पेंशना योजना (डी. सी. पी. एस.) व राष्ट्रीय पेंशन योजना (एन. पी. एस.) लागू करण्यात आली आहे. मात्र डी. सी. पी. एस. व एन. पी. एस. योजनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारात दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये डी. सी. पी. एस. व एन. पी. एस. योजनेविषयी असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जुन्या पेंशन योजनेच्या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात आली. त्यामध्ये १८ डिसेंबर २०१७ ला नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात ५० हजार कर्मचाऱ्यांसह मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाºयांना सेवा व मृत्यू उपदान तसेच कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ तात्काळ देऊ व सर्व कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले.मात्र या आश्वासनाला तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही कोणताही शासन निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सरकारला स्मरण करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री वित्तमंत्री यांना पाठविण्यात आले.यावेळी राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुशांत निमकर, जिल्हासचिव निलेश कुमरे, उपाध्यक्ष अविनाश चवले, कोषाध्यक्ष जितेंद्र बल्की, कार्याध्यक्ष प्रशांत खुसपुरे, सल्लागार सुनील दुधे, आदेश मानकर, एम.बी. मडावी, महिला उपाध्यक्ष नुतन मेश्राम यांच्यासह महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून आलेले विविध विभागाचे शासकीय निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:59 PM
शासनाने बंद केलेली जुनी पेन्शन योजना नव्याने सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आंदोलन