लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. दरम्यान कामगारांचे थकीत वेतन तातडीने देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.मेडिकल कामगारांनी विनावेतन एक तास काम करून एक अभिनव आंदोलनही केले होते. परंतु कामगारांचे थकीत वेतन अदा करण्यात आले नाही. याबाबत कामगारांच्या एका शिष्टमंडळाने नगरसेवक देशमुख यांच्या नेतृत्वात प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले. सरकारी विभागांमध्ये कार्यरत सर्वच कंत्राटी कामगारांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाºयांचे दर महिन्याला नियमित वेतन दिले जाते. परंतु अत्यल्प पगारावर शासनाला सेवा देणाºया कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत आहे. या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. शाळा सुरु होऊनही मुलांचा शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी त्यांची दमछाक होत आहे. या समस्येकडे मेडिकल कॉलेज प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही कार्यवाही झाली नाही. हीबाब कामगारांनी अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. सरकारी विभागातील सर्वच ठेकेदारी कामगारांचे नियमितपणे वेतन देण्याचे धोरण आखावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.सर्वसमावेशक वेतन धोरण तयार करणार- ना. मुनगंटीवारमेडिकल कॉलेज व रुग्णालयातील कामगारांच्या थकीत वेतनाची चौकशी करून कारवाई करू. तसेच शासनाच्या सर्वच विभागातील ठेकेदारी कामगारांना नियमित वेतन देण्याचे धोरण आखण्याचे आश्वासन अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कामगारांवर कोणत्याही स्थितीत अन्याय होणार नाही. याकडे विशेष लक्ष देत असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. शिष्टमंडळामध्ये प्रहारचे नशा निरगुडे सतीश खोब्रागडे सतीश सांबरे, सतीश घोनमोडे, दिनेश कंपू किशोर महाजन, देवराव हटवार तसेच प्रहारचे पदाधिकारी पस्थित होते.
मेडिकल कॉलेजच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 10:02 PM
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. दरम्यान कामगारांचे थकीत वेतन तातडीने देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ठळक मुद्देसमस्या : प्रहार संघटनेच्या नेतृत्वात वेधले समस्यांकडे लक्ष