आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कौशल्य विकासाची घोषणा केली होती. त्यानुसार चंद्रपुरमध्ये सेंन्ट्रल इन्स्ट्टियुट आॅफ प्लॅस्टिक इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था सुरु करुन गरीब, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील मुलांना रोजगार मिळत आहे. केंद्रीय मंत्री म्हणून या विभागासाठी हे काम करु शकल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.सिपेटमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या फेरीतील मुलांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम एक हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. नाना शामकुळे, जि. प.अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, वरोराचे नगराध्यक्ष एहेतशाम अली, माजी मंत्री संजय देवतळे, उपमहापौर अनिल फुलझेले, सिपेटचे प्रकल्प प्रमुख मिलिंदकुमार भरणे उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर पुढे म्हणाले. विदर्भातील प्रभावी असणाºया या प्रशिक्षणाला आगामी काळात वैभव प्राप्त होणार आहे. पहिल्याच तुकडीतील शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्याचा आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील कौशल्य विकास उपक्रमाचे हे जीवंत उदाहरण आहे. चंद्रपूरमधील औद्योगिक संस्थांनी या प्रशिक्षणार्थ्यांना स्थानिक स्तरावरही संधी द्यावी, असे आवाहन केले.केंद्रीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री असताना या प्रशिक्षणाबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी या इन्स्ट्टियुटमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर लगेच रोजगार उपलब्ध होतो. ही बाब मला लक्षात आल्यानंतर यासाठी प्रयत्न केले. भारतात २७ ठिकाण ही संस्था चालते. त्यात चंद्रपूरचा सहभाग आहे. त्यामुळे आज खरा आनंद होत आहे. भारत सरकारच्या रसायणे, खते मंत्रालयातंर्गत येणाºया केमीकल आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या अंतर्गत चंद्रपूर येथे सेन्टर यून्स्टिटयुट प्लॉस्टिक इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था काम करते. महाराष्ट्रात औरंगाबाद नंतर चंद्रपूर येथे ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेमार्फत प्रशिक्षण मिळालेल्या ९० टक्के मुलांना चांगल्या कंपनीत हमखास नोकरी मिळत आहे. या संस्थेची सुरुवात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे पेट्रोकेमिकल विभाग असताना झाली. ही संस्था चंद्रपूरच्या वैभवात भर घालणारी संस्था आहे. संचालन सिध्दार्थ दाभाडे यांनी केले. यावेळी अनेक अधिकाºयांची उपस्थिती होती.
‘सिपेट’च्या प्रशिक्षणातून बेरोजगारांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:17 AM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कौशल्य विकासाची घोषणा केली होती. त्यानुसार चंद्रपुरमध्ये सेंन्ट्रल इन्स्ट्टियुट आॅफ प्लॅस्टिक इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) ही संस्था सुरु करुन गरीब, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील मुलांना रोजगार मिळत आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर : पहिल्या तुकडीतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण