शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

चंद्रपुरातील अतिक्रमण, कचरा हटविण्याची समस्या दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:38 PM

महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच नवीन दोन जेसीबी मशीन खरेदी करण्यात आल्याने अतिक्रमण हटविणे व कचरा उचलण्याची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजेसीबी मशीन खरेदी : भाड्याने मशीन घेण्याचा मनपाचा प्रश्न मिटला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच नवीन दोन जेसीबी मशीन खरेदी करण्यात आल्याने अतिक्रमण हटविणे व कचरा उचलण्याची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते मंगळवारी या मशीनचे पूजन करण्यात आले. मनपाकडे स्वत:चे बॅकहो लोडर नसल्याने भाड्याने घ्यावे लागत होते. यावर होणारा आर्थिक खर्चदेखील परवडण्यासारखा नव्हता. यामध्ये बचत करण्यासाठी आयुक्त काकडे यांनी नवीन मशिन्स खरेदी करण्याची सुचना केली होती. त्यानुसार मनपा स्वच्छता विभागातर्फे केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जेम पोर्टलद्वारे या दोन मशिन्सची आॅनलाईन खरेदी करण्यात आली आहे. सदर मशीन फोर व्हील ड्राईव्ह व जीपीएस प्रणालीयुक्त असून यामध्ये अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.अतिक्रमण काढणे, खड्डे खणणे, डम्पिंग यार्डवरील कचरा उचलणे इत्यादी विविध कामांसाठी या मशीनची आवश्यकता भासते. मनपाकडे स्वत:ची बॅकहो लोडर मशीन असल्याने खर्चात बचत होणारच आहे मनपाला साधनांसाठी इतरत्र अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्यास मदत मिळणार आहे. यावेळी स्थायी समिती सभापती राहुल पावडे, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, प्रभारी उपायुक्त गोस्वामी, शहर अभियंता बारई, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) नितीन कापसे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मडावी, माकोडे व अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.आर्थिक खर्चात बचतमनपाकडे स्वत:ची जेसीबी मशीन नसल्याने आतापर्यंत भाड्याने आणावे लागत होते. त्यामुळे मशीनधारक मालकाला पैसे देण्याची वेळ आली. यातून मनपाच्या तिजोरीवर भार पडला होता. शहरातील वाढती लोकसंख्येला अनुसरून नागरी सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च होतात. अशा परिस्थितीत भाड्याने मशीन घेणे परवडणारे नव्हते. यावर कायमचा पर्याय म्हणून प्रशासनाने दोन जेसीबी मशीन विकत घेतले, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.