मात्र नगरपंचायत प्रशासनाला व संबंधित विभागाला काहीही देणे-घेणे दिसून येत नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर जवळपास सर्वच पदपथावर अतिक्रमण झालेले असून यावर लघु व्यवसायिकांनी आपला व्यवसाय थाटला आहे. काही बहाद्दरांनी तर चक्क रस्त्यावरच अतिक्रमण करून आपले खोके, लोडिंग गाड्या उभ्या करून ठेवल्याचे दिसते. काही जण तर कोणतेही दुकान न टाकता अतिक्रमित जागा चक्क भाड्याने देऊन महिन्याचे हजारो रुपये कमवत आहेत. याबाबत अनेकांना कल्पना आहे. परंतु कोणी काही करताना दिसत नाही. शिवाजी चौक ते जुना बसस्थानक, नवरगाव रोड, पाथरी रोडवर सर्वात जास्त अतिक्रमण केल्याचे दिसते. सिंदेवाही बसस्थानकच्या बाजूला अतिक्रमणामुळे बसडेपोमधून निघताना बस चालकाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. या परिसरात अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहेत.
कोट
शहरात वाढलेले अतिक्रमण धारकांवर योग्य नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोरोना काळात हे शक्य नव्हते. त्यामुळे कारवाई थंडबस्त्यात राहिली. मात्र शहराची पाहणी करून आता कारवाई करण्यात येईल.
- डॉ. सुप्रिया राठोड, मुख्याधिकारी नगरपंचायत सिंदेवाही.