लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अभियंतांनी दूरदृष्टी ठेवून सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान जोपासल्यास चांगली कामे होऊ शकतात. उत्तम अभियंत्याचे हेच लक्षण आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले. अभियंता दिनानिमित्त संकल्प महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात विविध स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. आयोजन करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, डॉ. स्वप्नील वंजारी, डॉ.श्रीकांत गोडबोले व हर्षदा धोंडरीकर, राजकुमार मीना उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी निबंध, लघू संदेश स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच मुख्य अभियंतांच्या संकल्पनेनुसार एक नवीन स्पर्धा ‘महानिर्मितीमधील माझे योगदान’ आदी विषयांवर स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमात नवीन डॉ. वंजारी यांनी ‘राखेचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.श्रीकांत गोडबोले यांनी मार्गदर्शन केले.मुख्य अभियंता बोबडे म्हणाले, आजच्या आधुनिक युगात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. यामध्ये टिकायचे असेल तर अभियंतांनी गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी गरज आहे. सर विश्वेशरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात मूलभूत योगदान दिले. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन वाटचाल करावे, असेही बोबडे यांनी सांगितले. अभियंता दिनाचे औचित्य साधून अन्य मान्यवरांनीही विचार मांडले.उपमुख्य अभियंते राजू घुगे, अनिल आष्टीकर, मधूकर परचाके, राजेश राजगडकर, राजेश ओसवाल, राजू सोमकुवर, सुरेंद्र निशानराव, बालू इंगळे, संभाजी बडगुजर, हेमंत ढोले व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. स्पर्धेतील विविध सत्रांचे संचालन तिलेश पेंढारकर, सोनाली धुरी यांनी केले. नवल दामले यांनी आभार मानले.
अभियंत्यांनी दूरदृष्टी ठेऊन कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:02 PM
अभियंतांनी दूरदृष्टी ठेवून सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान जोपासल्यास चांगली कामे होऊ शकतात. उत्तम अभियंत्याचे हेच लक्षण आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले. अभियंता दिनानिमित्त संकल्प महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात विविध स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्देजयंत बोबडे : चंद्रपूर महाऔष्णिक विघुत केंद्रात अभियंता दिन