फोटो निवेदन देताना अंगणवाडी महिला
चिमूर : झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा शैक्षणिक बेसिक पाया मजबूत करण्याच्या कामासह इतरही प्रशासकीय काम अंगणवाडी कर्मचारी करतात. मात्र सरकारने मराठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कॅश ॲप नंतर इंग्रजी ॲप पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून इंग्रजीतील ॲप पोषण ट्रॅकर मराठीत करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी सभा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष इमरान कुरेशी यांनी केली आहे.
यापूर्वी अंगणवाड्यांच्या दैनंदिन कामाची माहिती केस ॲपमध्ये भरली जात होती. या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर रजिस्टरमध्ये माहिती भरण्याचे आदेश सरकारने दिले. नुकत्याच मिळालेल्या आदेशानुसार २०१४ पासूनची सर्व माहिती पुन्हा एकदा भरायला सांगितली आहे. शासनाला नियमितपणे दिलेली माहिती परत भरायला लावणे अन्यायकारक असताना पुन्हा नवीन ॲप पोषण ट्रॅकरवर तीच माहिती भरण्याचा आदेश आला आहे. या इंग्रजी ॲप वर माहिती भरताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. अनेकांकडे स्मार्ट फोन नाहीत तर काही जण कुटुंबातील खाजगी फोन वापरतात. त्यांना वेळेवर फोन उपलब्ध होईल सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रतीचा फोन शासनाने उपलब्ध करून द्यावा, इंग्रजी ॲप पोषण ट्रॅकर मराठीत उपलब्ध करून द्यावे, अडचणी सुटेपर्यंत काम करता येणे शक्य नाही, दरम्यान तहसीलदार संजय नागटिळक यांचेमार्फत शासनाकडे अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष इमरान कुरेशी यांनी निवेदन पाठविले आहे. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष माधुरी विर, चंदा जांभुळकर, मंगला गोठे, रजनी मेश्राम, सविता मेहरकुरे आदींची उपस्थिती होती.