लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा) : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात गोसेखुर्दचे पाणी टाकण्याचा निर्णय विदर्भ पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतांसोबत नागपूर येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.लाभ क्षेत्रातील पाण्याअभावी शेतकऱ्यांची धानपिके वाया जातात. त्यावर पर्याय म्हणून गोसीखुर्द धरणाचे पाणी उपसा सिंचनाद्वारे घोडाझरी तलावात टाकावे, याकरीता घोडाझरी संघर्ष समितीने अनेकदा आंदोलन केले होते. परिणामी, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत विदर्भ पाटबंधारे विभागाची नागपुरात बैठक झाली.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने आंदोलनाची दखल घेऊन घोडाझरी संघर्ष समितीकडे तीन पर्याय सुचविले होते. पर्याय क्रमांक १ नुसार गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या १८ किलोमीटरपासून घोडाझरी तलावात २० दलघमी पाणी वळते करण्याकरीता ८६ कोटी ५६ लाख रुपयांचा खर्चाचा अंदाजपत्रक सादर केला होता. पर्याय क्रमांक २ नुसार घोडाझरी शाखा कालव्यावरून शाखा कालव्याच्या १६ किमीवर घोडाझरी तलावात पाणी उपसा सिंचन योजना सुरू करावी. या अंदाजपत्रकाची किंमत ५१.१५ कोटी ठरविण्यात आली. गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील जलाशयामधून नदीवर किंकाळा गावाजवळ उपसा सिंचन योजना सुरू करावी, त्यासाठी अंदाजपत्रकानुार १३८.२९ कोटीचा खर्च अपेक्षीत असल्याचे तिसºया पर्यायात नमूद केले होते. विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे, खासदार नेते, आमदार भांगडिया, संघर्ष समितीचे कामडी आदींनी पर्याय क्रमांक १ सोयीचे असल्याचे सुचविले. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात टाकण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. बैठकीला माजी आमदार अतुल देशकर, नरेंद्र कामडी, परसराम बागडे, रूपचंद झोडे, वसंत बडवाईक, होमदेव मेश्राम, तुळशिदास म्हस्के, डॉ. घनश्याम कामडी, संजय अगडे, जयंत आमले, विनोद मिसार उपस्थित होते.
सिंचनासाठी मिळणार पुरेसे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:33 PM
नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात गोसेखुर्दचे पाणी टाकण्याचा निर्णय विदर्भ पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंतांसोबत नागपूर येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.
ठळक मुद्देनागपुरातील बैठकीत निर्णय : गोसेखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात सोडणार