बल्लारपूर : चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनची २०२१-२०२३ ची निवडणूक २२ सप्टेंबरला होत असून यंदाच्या निवडणुकीसाठी वकीलवर्ग चांगलाच उत्साहित दिसत आहे.
चंद्रपूर बार असोशिएशन चंद्रपूरच्या अध्यक्षपदासाठी सात वकिलांनी अर्ज दाखल केले आहे. कार्यकारिणीच्या १२ सदस्य पदासाठी ३० वकिलांनी नामांकन दिले आहे तर उपाध्यक्षपदासाठी तीन, सहसचिव पदासाठी सहा, सहसचिव पदासाठी दोन, कोषाध्यक्ष पदासाठी चार व ग्रंथपालसाठी दोन वकिलांनी अर्ज दाखल केले आहे. १६ सप्टेंबरला अर्ज परत घेण्याची तारीख असून अध्यक्षपदासाठी उभे असलेल्या सात जणांपैकी किती वकील अर्ज मागे घेतात, याकडे सर्व वकील मंडळींचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन परिसरात वकिलांचा समूह निवडणुकीची चर्चा करताना दिसत आहे. निवडणुकीचे काम मुख्य निवडणूक अधिकारी ॲड.बी.पी.टिकले पाहत आहे.
बॉक्स
अध्यक्षपदासाठी अशी आहे मर्यादा
चंद्रपूर जिल्हा बार असोशिएशन चंद्रपूरच्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारासाठी नियमावली आहे. अध्यक्षपद व उपाध्यक्षसाठी १५ वर्षाचा सराव आवश्यक, सचिवपदासाठी १० वर्ष सराव आवश्यक, सहसचिव आणि कोषाध्यक्ष या पदासाठी पाच वर्षाचा सराव आवश्यक आहे. ग्रंथपाल पदासाठी तीन वर्षाचा सराव आवश्यक आहे.