लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड नगर परिषदेतंर्गत येत असलेले बाम्हणी हे संपूर्ण बाम्हणी गाव पाण्याखाली आले आहे. गावाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट दिली आहे. या पाण्याने जीवनावश्यक वस्तूंची मोठया प्रमाणावर नासधूस झाली आहे. शनिवारी सकाळी गावातील नागरिक आपल्या शेताच्या कामावर जाण्यासाठी तयारी करीत होते. गावातील नागरिक आपल्या नेहमीच्या कामाची तयारी करीत होते. अशातच सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान कोणाच्याही ध्यानीमनी नसताना पाणी अचानक गावात शिरले. पाणी गावात शिरताच लोकांची एकच तारांबळ उडाली. जो तो आपले सामान वाचवण्यासाठी धडपड करू लागला. बाम्हणी गावातील सखल भागातून कमरेच्या आसपास पाणी वाहू लागले. यामुळे घरात पाणी घुसले. या पाण्याने घरातील गहू, तांदूळ व इतर चिजवस्तू ओल्या झाल्या. दरम्यान काही जागरूक नागरिकांनी तहसीलदार मनोहर चव्हाण यांना ही माहिती दिली. प्रशासकीय अधिकारी बाम्हणीत दाखल झाले आहेत.२०० घरे पाण्यातबाम्हणी २६० घरांची लोकवस्ती आहे. यातील जवळपास २०० घरे पाण्याखाली आहेत. या २०० घरातील चिजवस्तूंची नासधूस झाली आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात तहसिलदार मनोहर चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, चार पाच घरे पूर्णत: पडली आहेत. या घरातील लोकांची जुन्या ग्रामपंचायतीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याचे टँकर बोलाविण्यात आले आहे. जेवणाच्या व्यवस्थेबद्दल प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागालाही सूचित करण्यात आले आहे.
अख्खे बाम्हणी गाव पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 12:39 AM
नागभीड नगर परिषदेतंर्गत येत असलेले बाम्हणी हे संपूर्ण बाम्हणी गाव पाण्याखाली आले आहे. गावाला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट दिली आहे. या पाण्याने जीवनावश्यक वस्तूंची मोठया प्रमाणावर नासधूस झाली आहे.
ठळक मुद्देएकच धावपळ । ध्यानीमनी नसताना अचानक शिरले पाणी