चंद्रपूर : इरई आणि झरपट या दोन्ही नद्या चंद्रपूरची जीवनदायिनी आहे. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने या नद्यांचे मोठे महत्त्व आहे. मात्र नदीपात्रात अवैध बांधकाम सुरू असल्याने अस्तित्व धोक्यात आले. जिल्हा प्रशासनाने हे अतिक्रमण हटविण्याची मागणी इरई व झरपट नदी बचाव संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
पावसाळ्यात पुराचे पाणी घरात घुसून जनजीवन विस्कळीत होते. अशा स्थितीत इरई नदीवरील रामझुला दाताळा पुलापासून सिव्हरेज प्लांटपर्यंत तिथून पुढे शांतिधाम स्मशानभूमीपर्यंत पठाणपुरा झरपट नदी व इरई नदीच्या संगमापर्यंत बेकायदेशीररीत्या अतिक्रमणधारकांनाच नुकसान मोबदला मिळतो. हा प्रकार अन्य नागरिकांवर अन्यायकारक आहे. नद्यांचे खोलीकरण करावे, पूरग्रस्त भागात बेकायदेशीर भूखंड पाङून घरे बांधण्यास आळा घालावा, प्रशासनाने नदीपात्रात दोन्ही बाजूला वृक्षांची लागवड करावी, अशी मागणी नदी बचाव संघर्ष समितीचे अश्विन मुसळे, सचिन कोतपल्लीवार, देवानंद साखरकर, ललित मुलेवार, समीर लाभ, श्याम हेडाऊ, मनीष पांडे, स्वाती बोरडकर, चेतन पटेल, हिमांशू दहेकर, नंदू लभाने, स्वप्नील धानोरकर, संजय तोकट्टीवार, जतीन पटेल, रोहन पाटील, अतुल श्रीमंतवार, गणेश मेश्राम, शशांक मोहरकर, करण तोगट्टीवार, रोहित बेलसरे, ओमकार मत्ते, परिक्षित केदार पवार आदींनी केली आहे.