लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या आदिवासीबहुल नक्षलप्रभावित क्षेत्रात मोठया प्रमाणावर वनसंपदा आहे. जैवविविधतेने समृध्द असलेल्या या भागात वनावर आधारित उद्योग क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. या उद्योगाच्या स्थापनेसाठी पाच वर्षांपर्यंत टॅक्स हॉलिडे घोषित करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सहकार्य करण्याची मागणी महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी केली.बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २०१९ मध्ये आहे. त्यांच्या या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने सेवाग्राम विकास योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेसाठी २६६ कोटींचा निधी प्रस्तावित आहे. या योजनेंतर्गत पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे. या योजनेसाठी दोन तृतीयांश सहयोग म्हणजे १७७ कोटींचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करावा, अशी मागणीही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.या बैठकीत बोलताना राज्याच्या विकासासंदर्भात काही महत्वपूर्ण मागण्यांकडे त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी कृषी, सिंचन, शिक्षण, महिला व बालविकास, ऊर्जा, रेल्वे आदी विभागांशी संबंधित मागण्यांकडेसुध्दा त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे लक्ष वेधले.
वनावर आधारित उद्योग स्थापनेसाठी केंद्राने पाच वर्षांसाठी टॅक्स हॉलिडे घोषित करावा; सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:41 PM
महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या आदिवासीबहुल नक्षलप्रभावित क्षेत्रात मोठया प्रमाणावर वनसंपदा आहे. जैवविविधतेने समृध्द असलेल्या या भागात वनावर आधारित उद्योग क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.
ठळक मुद्देकेंद्रीय अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठकीत केली मागणी