दरवर्षी विविध मंडळांच्या वतीने विलोभनीय दृश्य, गणपतीचे डेकोरेशन, मंडपात सजावट करून स्थापना केली जाते. चालू घडामोडीच्या आधारावर योग्य अशा परंपरेची आखणी करून विविध प्रकारच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. मंडळाच्या वतीने स्पर्धा, शिबिर आयोजित केल्या जातात. दरवर्षी आनंद मेळा भरविला जातो. आकाश पाळणे, खेळणी, विविध वस्तूंच्या विक्रीतून रोजगाराची संधी उपलब्ध होत असते; परंतु बंदी सावट आहे. शहरातील २० मंडळांचे गणपती बसविताना स्पर्धाच निर्माण होत होती. कोरोनामुळे यंदा आनंदावर विरजण आले आहे.
सिंदेवाहीत मस्कऱ्या गणपतीची आज स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:32 AM