लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अप्पर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून साकारलेले व महाराष्ट्र कारागृह विभागाचे सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीद वाक्य साध्य करीत चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये कारागृह अधीक्षक डॉ. बी.एन. ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत बंदी बांधवासाठी सेल्प हेल्प ग्रुपची स्थापना करण्यात आली.यामध्ये कारागृहातील बंदीवानांमधील तणाव दूर करुन त्यांच्यामध्ये जीवनाप्रती सकारात्मक आशावाद प्रफुल्लीत करणे, आत्महत्या सारखे निराशावादी व नकारात्मक विचार दूर व्हावे हा सेल्फ हेल्प गृपच्या स्थापनेमागील उद्देश आहे. त्याचप्रमाणे बंदीवानांमधील ही नकारात्मक प्रवृत्ती दूर करण्यासाठी कारागृहातीलच प्रत्येक बॅरेक मधील ज्या बंद्याची कारागृहातील वर्तणूक चांगली आहे तसेच जे बंदी कारागृह शिस्तीचे व नियमांचे पालन करतात तसेच ज्यांचे मनोबल , मनोधैर्य चांगले आहे, अशा निवडक बंद्याची निवड करण्यात आली आहे.अधीक्षक डॉ. बी. एन.ढोले यांनी इतर बंदी बांधवांना यासाठी विशेष प्रेरणा देवून बंदीवानांना सेल्फ हेल्प गृप मार्फत सुधारणेसाठी समुपदेश, कारागृह स्वच्छता अभियान, योगासण वर्ग, बंद्याचे शिक्षण, वैद्यकीय मदत, कायदेविषयक मदत, चित्रकला स्पर्धा, विविध सामाजिक विषयावर निंबंध स्पर्धा आदी उपक्रम राबविणे सुरु केले आहे.बंद्याच्या या सेल्फ हेल्प गृपचे कारागृहातील सुमारे ७०० बंदीबांधवांनी स्वागत केले आहे. या उपक्रमाच्या उदघाटनीय कार्यक्रमाचे संचालन कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी केले. तर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम, तुरुंगाधिकारी सुनिल वानखडे, सुभेदार उमरेडकर, मोटघरे, हवालदार मोहन कौरती, रक्षक लक्ष्मीकांत ओझा, रवी पवार, रोशन मुटकुरे, रिंकू गौर, राजेंद्र ठाकूर, पद्माकर मेश्राम, विनोद भगत, पंकज इंगळे, नितीन खोब्रागडे, रेवनाथ हुकरे यांनी परिश्रम घेतले.
चंद्रपूर कारागृहात सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:08 PM
अप्पर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून साकारलेले व महाराष्ट्र कारागृह विभागाचे सुधारणा ....
ठळक मुद्देबंदीवानांमधील तणाव होणार दूर : कारागृह अधीक्षकांचा उपक्रम