तपासकार्य सुरूच : नाव आणि दुचाकीही बेपत्ता ब्रह्मपुरी : तालुक्यातील लाडज या गावातील गावकऱ्यांना घेवून जाणारी नाव उलटण्याचा घटनेला १२ तास लोटूनही अद्याप दोनञही बेपत्ता गावकऱ्यांचा थांपपत्ता लागलेला नाही. प्रशासन आणि बचाव पथक या दोघांचाही नदीपोात आणि नदीच्या काठाने शोध घेत आहेत. सकाळी ही दुर्घटना घडल्यावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बचाव पथकांनी संयुक्तपणे शोध मोहीम आणि बचाव कार्य आरंभले होते. नावेत असणाऱ्या १२ जणांपैकी १० जणांनना वाचविण्यात यश आले असले तरी माधव देवाजी मैद (४०) व सचिन शंकर चनेकार (२०) या दोघांचा शोध अद्यापही लागलेला नाही. दिवसभ त्यांचे शोधकार्य सुरू होते. मात्र पथकाला नावेवरील दुचाकी अथवा नावही कुठेच आढळली नाही. सायंकाळनंतर अंधारामुळे तपास कार्य थांबविण्यात आले आहे. दुचाकी कुणाच्या मालकीची होती हे मात्रकळू शकले नाही. सावंगी घाट हा गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा तालुक्यात येतो व बुडलेले गावकरी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील असल्याने ब्रह्मपुरी व वडसा या दोन्ही तालुक्याच्या बचाव पथकाने प्राण वाचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. घटनेचे वृत्त कळताच आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजभे, वडसा देसाईगंजच्या नगराध्यक्षांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सकाळपासून ते ठाण मांडून शोध कार्यात मदत करीत होते. ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनीही घटनास्थळी येवून बचाव कार्यात मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)
१२ तासानंतरही दोघांचा थांगपत्ता नाही
By admin | Published: July 13, 2016 1:58 AM