बॉक्स
शासकीय व निमशासकीय कार्यालयातच लॅण्डलाइन
पूर्वी बीएसएनएल कंपनीने लॅण्डलाइनचे जाळे विणले होते. मात्र, त्यानंतर अनेक खासगी कंपन्या दूरसंचार विभागात दाखल झाल्या. त्यामुळे प्रत्येकाच्या घरीच लॅण्डलाइन दिसत होते. मात्र, आता ही संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांत तसेच काही प्रतिष्ठानांत लॅण्डलाइन दिसून येत आहे.
बॉक्स
बोटावर मोजण्याइतके कॉइन बॉक्स
पूर्वी प्रत्येक पानठेला, किराणा दुकान, मेडिकल येथे कॉइन बॉक्स दिसून येत होते. मात्र, आता
मोबाइल आल्याने कॉइन बॉक्सचा वापर घटला आहे. त्यामुळे शहरातील एसटीडी बूथ, कॉइन बॉक्स बंद झाले आहेत. मात्र, दुर्गम भागात कॉइन बॉक्स दिसून येतात. त्याचीसंख्यासुद्धा अल्प आहे.
बॉक्स
कॉइन बॉक्स वापरणारे कोण?बाहेरराज्यातून आलेला मजूर वर्ग वीटभट्ट्यांवर काम करणारे, कोळसा डेपोवर काम करणारे मजूर वर्ग कॉइन बॉक्सचा वापर करताना दिसून येतात. म्हणूनच कॉइन बॉक्स कमी असले तरी सुरू आहेत. एक रुपयात कॉल करून संपर्काचे साधन आता तुलनेने महाग पडते; परंतु त्याचासुद्धा वापर होत आहे.
कोट
म्हणून लॅण्डलाइन आवश्यक
मोबाइलने सतत बोलण्यास त्रास होते. याउलट लॅण्डलाइन हा वापरण्यास सोईचा आहे, तसेच मोबाइलपेक्षा लॅण्डलाइनमध्ये स्पष्ट आवाज येतो. मोबाइल हा कार्यालयीन कामासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
-नीलम बोरकर
-------
शासकीय व निमशासकीय कार्यालयांत लॅण्डलाइन दिसून येतो, तसेच अकस्मात सेवेच्या ठिकाणी फोन करण्यासाठी लॅण्डलाइन क्रमांकच दिल्या जातात. तेथे हमखास फोनही लागतो.
-आदित्य रामटेके