हा जुगार जीवघेणा ठरू शकतो. कारण तेथूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. मटका, जुगार, अवैध दारू, प्रतिबंधित गुटखा सर्रास मिळत आहे. पत्ते खेळायला येणाऱ्या इतरांनाही हा संसर्ग असण्याची भीती वर्तविली जात आहे. जुगारासाठी वाटल्या जाणाऱ्या पत्त्यांना खेळणाऱ्या अनेकांचे हात लागतात व त्यातूनच कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात अनेक शाळकरी मुले शाळा बंद झाल्यामुळे जुगार खेळण्यात व्यस्त दिसतात. तरुणसुद्धा यात मागे नसून ते सुद्धा जुगार खेळण्यात पटाईत आहेत. किमान लॉकडाऊन काळात संयम राखणे जीविताच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे. कोरोनाच्या या महामारीत जुगार खेळणारेच नव्हे, तर खर्रा, गुटखा खाणारे, गावठी-अवैध दारू पिणारे या सर्वांसाठीच जीव वाचवायचा असेल, तर स्वयंशिस्त महत्त्वाची ठरणार आहे.