चंद्रपूर : दुर्गापुरातील रमेश लष्करे यांच्यासह कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू घरगुती जनरेटरमधील गॅस गळतीने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत पोलीस तपासातून नेमके कारण पुढे येऊ शकेल; मात्र घरगुती जनरेटर कसे वापरावे, याबाबत तांत्रिक माहिती असेल तर अशा घटना टाळता येऊ शकतात, असा सल्ला चंद्रपुरातील जनरेटर एक्सपर्ट श्रीधर हुलके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
दुर्गापूर येथील दुुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जनरेटरची तांत्रिक माहिती देताना श्रीधर हुलके म्हणाले की, घरघुती व औद्योगिक असे दोन प्रकारचे जनरेटर असतात. जनरेटरचा कधी आणि कसा वापर करायचा, याची माहिती तांत्रिक कारागिराकडून कुटुंबाने न चुकता घ्यावी. संभाव्य धोके टाळण्यासाठी जनरेटर खुल्या क्षेत्रात उत्तम वेंटिलेशनसह कार्य केले पाहिजे, यावरच कारागिरांचा कटाक्ष असतो. विस्फोटक वातावरणात जनरेटरचा वापर केला जात नाही. कारण, त्यात ज्वलनशील इंधन असते. जनरेटर चालू असताना गॅस कॅप उघडू नका. इंधन बंद करण्यापूर्वी इंजिन बंद करा आणि २-३ मिनिटांसाठी थंड होऊ द्या. जनरेटरला उघड्या ज्वाळांच्या भोवती भस्म करू नका, जनरेटर सपाट पृष्ठभागावर लावल्याची खात्री करा. जनरेटर कधीही
झुडू
नये अन्यथा इंधन टाकीतून बाहेर पडून आग लागू शकते, असा इशाराही हुलके यांनी दिला.
जनरेटर कुठेही अन् कसाही लावू नये
जनरेटर कधीही कव्हर करू नका व बंद खोलीत लावू नका, असे आम्ही वारंवार सांगतो; मात्र वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यानंतर कसलाही विचार न करता अतिघाईने जनरेटर कुठेही (बेडरूम, बैठकरूम, किचनरूम) लावला जातो. सामान्य इंजिन ऑपरेशन आणि कूलिंगसाठी हवा सतत खेळती कशी राहील, याकडे गांभिर्याने लक्ष दिले तर जनरेटरपासून उद्भवणारे धोके टाळता येतात, असा सल्ला जनरेटर एक्सपर्ट श्रीधर हुलके यांनी दिला.
अनुभवी तांत्रिकांकडूनच जनरेटर तपासत राहावे
जनरेटरची इंधन पातळी तपासत राहा. त्याआधी सर्व पॉवर केबल्स डिस्कनेक्ट करा. इंजिन स्विच ऑफ स्थितीत असल्याचे सुनिश्चित करा. जनरेटरची देखभाल सुरू करण्यापूर्वी, जनरेटर ग्राउंड झाला व इंजिन बंद आहे, लोड डिस्कनेक्ट करून एसी स्विच बंद स्थितीत आहे की नाही, याची तर आवर्जून खात्री केली पाहिजे. घरी जनरेटर असल्यास अनुभवी तांत्रिकाकडूनच फिटींग केल्यानंतर नेहमी देखरेख करून घ्यावी, असेही हुलके यांनी सांगितले.