शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

अखेर बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाची प्रलंबित मागणी पूर्ण

By admin | Published: March 11, 2017 12:43 AM

राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची बहुप्रतीक्षित मागणी अखेर पूर्ण होत आहे.

आज भूमिपूजन : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकारचंद्रपूर : राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची बहुप्रतीक्षित मागणी अखेर पूर्ण होत आहे. या उड्डाण पुलाच्या बांधकामांचे भूमिपूजन आणि बाबुपेठ परिसरातील नवीन स्टेडियमच्या बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात येत आहे.शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. उड्डाण पुलाअभावी परिसरातील रेल्वे फाटकाजवळ होणारी वाहतुकीची कोंडी या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी अनेक आंदोलनेसुध्दा केली. याबाबत विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २००२ मध्ये विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यानंतर विरोधी पक्षात असताना मुनगंटीवार यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता.दोन वर्षांपूर्वी भाजपाचे स्थापन झाल्यानंतर वित्तमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर मुनगंटीवार यांनी या रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ना. मुनगंटीवार यांनी ६१ कोटी रुपये या पुलासाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्याकरिता ना. मुनगंटीवार यांनी विधानभवन, मुंबई येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत सदर रेल्वे उडडाण पुलाची निविदा एक महिन्यात प्रसिध्द करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांनी सुध्दा या मागणीचा सातत्याने पत्रव्यवहार व विधानसभेच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.बाबुपेठ परिसरातील भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यानाच्या लोकार्पण सोहळयात ना. मुनगंटीवार यांनी बाबुपेठ परिसरात नवीन स्टेडियमचे बांधकाम करण्याबाबत नागरिकांना आश्वासन दिले होते. या आश्वासनांची पूर्तता करीत त्यांनी स्टेडियम बांधकामासाठी ४ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या नवीन स्टेडियमच्या बांधकामाचे भूमिपूजनही शनिवारी होत आहे. (प्रतिनिधी)