लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा सभेनंतर स्वत:च्या दालनात बोलावून अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणारे वरोरा येथील उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्याविरुद्ध जिल्ह्यातील विस्तार अधिकारी संघटना तसेच वरोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघटना संतापल्या. दरम्यान, संघटनांचा रोष बघता उपविभागीय अधिकाऱ्यांनी माफी मागितली. मात्र संघटनांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी शासन तसेच प्रशासनाला निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.वरोरा येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोनासंदर्भात आढावा सभा घेतली. यावेळी तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. सभा आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूरकडे रवाना झाले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी अन्य अधिकाऱ्यांना चहापानासाठी आपल्या दालनात बोलाविले. यावेळी बीडीओसह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना बैठकीमध्ये योग्य उत्तर दिले नसल्याचे कारण समोर करीत त्यांच्यावर संताप व्यक्त केला. एवढेच नाही तर त्यांना तब्बल अर्धा तास उभे ठेवून १४ आणि १९ चा पाढा म्हणायला लावला. फुटकचे वेतन घेत असल्याचेही त्यांना सुनावल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, अपमानास्पद वागणुकीमुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अक्षरश: रडल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यानंतर अपमान सहन झाला नसल्याने त्यांनी संघटनांकडे आपण आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले. त्यानंतर संघटनांनी सोमवारी सकाळी एसडीओ शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला. यावेळी आपला अपमान करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे सांगून त्यांनी माफी मागितली. मात्र संघटनांचे समाधान झाले नाही. दरम्यान, संघटनांनी महसूल मंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.आढावा सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी गेले. त्यानंतर एसडीओंनी प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना अवास्तव प्रश्न विचारून त्यांना अपमानित केले. हा अपमान सहन झाला नसल्याने त्यांनी संघटनेकडे आत्मदहन करण्याचा इशारा दिला.याची दखल घेत एसडीओंना जाब विचारण्यात आला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी माफी मागितली.- रवींद्र लामगे, अध्यक्ष, शिक्षण विस्तार अधिकारी, संघटना चंद्रपूरप्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना कोणतीही अपमानास्पद वागणूक दिली नाही. त्यांना उभे ठेवण्याची शिक्षाही दिली नाही. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यासंदर्भात दोन मिनीटात आढावा सादर करण्यास सांगितले.- सुभाश शिंदे, उपविभागीय अधिकारी, वरोरा
अखेर संघटनेपुढे झुकले एसडीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:00 AM
वरोरा येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोनासंदर्भात आढावा सभा घेतली. यावेळी तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. सभा आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूरकडे रवाना झाले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी अन्य अधिकाऱ्यांना चहापानासाठी आपल्या दालनात बोलाविले.
ठळक मुद्देमागितली माफी : प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली अधिकाऱ्यांसमोर अपमानास्पद वागणूक