उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
वरोरा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश मिळणार काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु बारावीमधून उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश देऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात व्हेंटिलेटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, संजय देरकर आदी उपस्थित होते.
व्हेंटिलेटर लोकार्पण सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले की व्यावसायिक अभ्यासक्रमाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेच राज्यातील कुलगुरूंची बैठक आयोजित केली जाईल. यात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेसोबतच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत रूपरेषा ठरविली जाईल. मात्र डिप्लोमा अभ्यासक्रमाचे प्रवेश हे माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालावर दिले जातील. त्याकरिता कुठलीही अतिरिक्त पात्रता परीक्षा घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत १५ सप्टेंबरपासून विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले.
बॉक्स
गोंडवाना विद्यापीठाला वन व आदिवासी विद्यापीठाचा दर्जा देणार
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाला आठ कोटी रुपयांचे अनुदान दिले असून वन आणि आदिवासी विद्यापीठ म्हणून लवकरच त्याला दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात येईल. आदिवासी संस्कृती आणि वन संपदा यावर संशोधन करणारे देशातील ते पहिले विद्यापीठ असेल असेही ना. सामंत म्हणाले.
बॉक्स
तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची ना. सामंतांकडे मागणी
शिवसेनेच्या वतीने राज्यात आतापर्यंत सामाजिक सेवांतर्गत ३५० व्हेंटिलेटरचे वितरण करण्यात आले. वरोरा उपजिल्हा रुग्णालयाला याप्रसंगी तीन व्हेंटिलेटर ना. सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शासनाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाला ॲम्बुलन्स आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी याप्रसंगी त्यांच्याकडे केली.
===Photopath===
140621\img-20210614-wa0098.jpg
===Caption===
warora