कोट
-कोरोनाच्या काळात आम्ही घरी होतो. मात्र, माझी आई सतत कामाला जायची. ती घरी यायची कधी आणि जायची कधी, हे कळायचेच नाही. आता शासनाने ड्यूटी कमी केल्याचे आईने सांगितले. आता ती लवकर घरी येणार. आईसोबत वेळ घालवायला मिळणार. शासनाने महिला कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
-चैतन्य ठाकरे
------
आई सतत ड्यूटीवर असते. तिच्यासोबत कधी बाहेर जायला जमतच नाही. सुटीच्या दिवशी घरातील कामातच व्यस्त असते. मात्र, आई आता लवकर घरी येणार असल्याने ती मला अधिक वेळ देऊ शकेल. आम्ही बाहेर फिरायला जाऊ शकतो. त्यामुळे शासनाचा हा निर्णय मला खूपच आवडला.
-पुष्कर बारसागडे
----
कोरोनापासून आईच्या कामाची वेळ वाढली आहे. त्यामुळे ती लवकर घरी यावी, असे नेहमीच वाटायचे. आई ड्यूटीवर जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी सांगून जाते. आठवण आल्यानंतर फोन करून तिच्याशी बोलतो. कधी तरी ती घरी लवकर आल्यावर आम्हाला खूप आनंद होतो. आता आई दररोज लवकर येणार आहे. आम्ही खूप- खूप मजा करणार आहोत.
-नाझिया शेख