शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष : पहाडावरील नागरिकांना पक्क्या रस्त्यांचे स्वप्न धूसरप्रस्तुत प्रतिनिधीने पालडोह, कामतगुडा गावात भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यात अनेकांनी शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. खराब रस्त्यामुळे गावात वाहने जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचा बळी जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्ते हे प्रगतीचे पहिले पाऊल मानले जाते. मात्र जिवती तालुक्यातील रस्ते पाहिले की वास्तव्य लक्षात येते. माजटी, गणेरी, सोरेकासा, घोडणकप्पी, पालडोह, कामतगुडा (गौरी), अंतापूर, कलीगुडा, शंकरलोधी, धनकदेवी अशा अनेक रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. बांधकाम विभाग मात्र या तालुक्याकडे लक्ष द्यायलाच तयार नाही. देशाचा विकास करायचा असेल तर प्रथम खेड्याकडे चला. खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. मात्र शासकीय यंत्रणेलाच याचा विसर पडल्याचे दिसत आहे. वरील गावात कुठलेच वाहन जात नाही. गेले तरी मोठे कसरत करीत वाहन चालवावे लागते.वर्षभरापूर्वी आपण इतर गावात नाही; पण घोडणकप्पी गावात गेले होते. तेव्हा विदारक वास्तव्य आपणालाही पाहायला मिळाले. त्यानुसार संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून सूचना दिल्या आहेत. मात्र अजून कुठल्याच हालचाली दिसत नाही. याबाबत आणखी पाठपुरावा केला जाईल. - अश्विनी गुरमे, सभापती, पंचायत समिती, जिवतीरस्त्याअभावी विकास खुंटलापहाडावरील अनेक गावात दळणवळण करण्यासाठी असलेले मुख्य रस्तेच खराब झाल्याने शासनाच्या महत्वाकांक्षी अनेक योजना गावात आल्या नाहीत. स्वातंत्र्यानंतरही या गावांना आहे त्याच स्थितीत जीवन जगावे लागत असल्याचे मत पालडोहचे बालाजी पवार, घोडणकप्पीचे रामू आत्राम तर कामतगुडा (गौरीचे) उत्तम राठोड, भाऊसाहेब राठोड यांनी ‘लोकमत’समोर व्यक्त केले.
जिवंतपणीच भोगाव्या लागतात नरकयातना!
By admin | Published: September 26, 2015 12:48 AM