शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

इव्हीएम मशीन्स

By admin | Published: April 15, 2017 12:36 AM

चंद्रपूर महानरपालिका निवडणूक १९ एप्रिलला होत आहे.

आज करणार सील  मनपा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात  जाहीर सभांनी शहर दुमदुमलेअपक्ष उमेदवारांनी उडविली झोपचंद्रपूर : चंद्रपूर महानरपालिका निवडणूक १९ एप्रिलला होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज झाली आहे. इव्हीएम मशीन्समध्ये घोळ होऊ शकतो, अशी तक्रार काही राजकीय पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी १५ एप्रिलला राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर मतदानासाठी सर्व इव्हीएम मशीन्स मतपत्रिका टाकून सील केल्या जाणार आहे.१९ एप्रिलला मतदान होणार असल्याने १७ एप्रिललाच प्रचाराची रणधुमाळी बंद होणार आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी उमेदवारांकडे केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. या दोन दिवसात प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करणार आहेत. त्यामुळे प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात चांगलीच धूळवड दिसून येणार आहे. सध्या काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ यासह सर्वच पक्ष व निवडणुकीत उतरलेल्या संघटनांनी जाहीर सभांचा सपाटा सुरू केला आहे. दररोज या पक्षांच्या प्रभागात जाहीर सभा आयोजित केल्या जात आहे. सकाळी काँग्रेसची सभा झाली की सायंकाळी त्याच प्रभागात भाजप, शिवसेनेची सभा होत आहे. भाजपाचे ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया, राहुल पुगलिया, गजानन गावंडे, माजी आमदार सुभाष धोटे, आसावरी देवतळे, शिवसेनेचे आ. बाळू धानोरकर, उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार, राष्ट्रवादीचे शशिकांत देशकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य हे स्थानिक नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागाात फिरून मतदारांच्या भेटी घेत आहे. तर दुसरीकडे उमेदवार डोअर टू डोअर प्रचार करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. मनपा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनाही मोठे महत्त्व असते. निवडणुकीचे समिकरण अपक्ष उमेदवारांमुळे बिघडू शकते, याची जाणीव असल्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अशा अपक्ष उमेदवारांची चांगलीच धसकी घेतल्याचे दिसून येत आहे. मनपा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी इव्हीएम मशीन्समध्ये घोळ होत असल्याने निवडणूक बॅलेट पेपरने घ्यावी, अशी मागणी केली होती. निवडणूक आयोगाने या संदर्भात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. यात इव्हीएम मशीन वापरल्यास त्यात व्हीव्हीपीएटीची सोय उपलब्ध करावी, अशी मागणीही होती. मात्र व्हीव्हीपीएटीची सोय उपलब्ध होणार नसल्याचे निवडणूक आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १९ एप्रिलच्या मतदानासाठी या इव्हीएम मशीन्स १५ एप्रिलला निवडणुकीच्या स्ट्रांग रुममध्ये (बॅडमिंटन हॉल, जिल्हा स्टेडीयम) सेट व सील करण्यात येणार आहे. उगाच मनात शंका नको म्हणून यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना व उमेदवारांनाही पाचारण केले आहे. त्यांच्या समक्षच या मशीन्स सील केल्या जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)१५ लाख मनपाच्या तिजोरीतउमेदवार प्रचारासाठी बॅनर, फ्लॅक्स, झेंडे, जनसंपर्क कार्यालय, रॅली, डिजीटल बोर्ड, वाहन आदींचा वापर करतात. जाहीर सभाही होतात. यासाठी उमेदवारांना मनपाकडून रितसर परवाना काढावा लागतो. यासाठी मनपाने एक खिडकी कक्षाची व्यवस्था केली आहे. या कक्षातून विविध उमेदवारांनी आतापर्यंत एक हजार १०० परवाने काढले आहेत. या परवान्याच्या शुल्कापोटी मनपाला १४ लाख ९६ हजार रुपयांची कमाई झाली असून तिजोरीत वाढ झाली आहे. स्लीप वाटण्याचा विसरमतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महानगरपालिकाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी बॅनर, फ्लेक्स लावून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय १२ ते १५ एप्रिलदरम्यान शहरात सर्वच नागरिकांना घरोघरी जावून व्होटर स्लीप देण्याचा कार्यक्रमही मनपा प्रशासनाने आखला. मात्र अद्यापही नागरिकांना व्होटर स्लीप मिळालेली नाही. मनपा प्रशासनाला आपल्याच आखलेल्या कार्यक्रमाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.