रोटरी व इनरव्हील क्लबचा उपक्रम
वरोरा : देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता लढणारे प्रसंगी हौतात्म्य पत्करतात. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यास सैन्यात दाखल होणाऱ्या व आपला कार्यकाळ पूर्ण करून येणाऱ्या वरोरा तालुक्यातील जवानांचा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब वरोरा व इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तद्नंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, माजी विधानसभा उपाध्यक्ष ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलेश पांडे, रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेल, सचिव बंडू देऊळकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष मधू जाजू, सचिव वंदना बोढे आदी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक कमलाकर पिजदूरकर, संदीप राजूरकर, नीलेश पावडे, सागर कोहळे, प्रवीण चिमूरकर, रवी तुराणकर, महेंद्र जीवतोडे, रोडे, हेमराज बेहरे, खापणे आदींचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरियन समीर बारई, विनोद नंदूरकर, अमित नहार, विजय पावडे, योगेश डोंगरवार, आशिष ठाकरे, पराग पत्तीवार, मनोज जोगी, राम लोया, जितेंद्र मत्ते, रवी शिंदे, मनोज कोहळे, दादा जयस्वाल, दामोधर भासपाले, प्रवीण किटे आदींची उपस्थिती होती.