शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

मुदतबाह्य झालेली औषधी बालकांना पाजली

By admin | Published: December 09, 2015 1:21 AM

राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील अंगणवाडीतील बालकांना कालबाह्य झालेली औषधी पाजण्यात आल्याची संतापजनक घटना आज मंगळवारी उघडकीस आली आहे.

अनेक बालके आजारी : सुब्बई अंगणवाडीतील संतापजनक प्रकारसुब्बई : राजुरा तालुक्यातील सुब्बई येथील अंगणवाडीतील बालकांना कालबाह्य झालेली औषधी पाजण्यात आल्याची संतापजनक घटना आज मंगळवारी उघडकीस आली आहे. कालबाह्य औषधी प्यायल्यामुळे अनेक बालकांवर विपरित परिणाम झाला असून काही बालके आजारी पडली आहेत. बेजबाबदारपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेमुळे पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करून निरागस चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.राजुरा तालुक्यातील सुब्बई या गावात एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी चालविली जाते. अनेक चिमुकले या ठिकाणी शिकत आहे. या अंगणवाडीमध्ये पोषण आहारासोबत बालकांना दर महिन्यादोन महिन्यांनी जंताची औषधीही दिली जाते. दरम्यान, ६ डिसेंबरला अंगणवाडीमधील बालकांना अशी जंताची औषधी पाजण्यात आली. मात्र ही औषधी मुदतबाह्य होती. त्यामुळे त्या औषधीचा अनेक बालकांवर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी बालकांना ताप, हगवण व उलट्या सुरू झाल्या. यामुळे पालक चांगलेच घाबरले. त्यांनी परत बालकांना अंगणवाडी केंद्रात नेऊन यावर औषधोपचार करण्यासा सांगितले. त्यावेळी अंगणवाडी सेविकांनी स्वत:च चुकीने मुदबाह्य औषधी बालकांना पाजल्याची माहिती दिली. यामुळेच बालकांची प्रकृती बिघडल्याची त्यांनी कबुली दिली. त्यामुळे पालकांमध्ये चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, विलास नंदीगमवार या शिक्षकांनाही त्यांच्या लहान बालकाला पाजण्यासाठी अंगणवाडीमधून तीच मुद्दतबाह्य झालेली औषधी दिली. मात्र त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ती औषधी न पाजता गावातील इतर पालकांना औषधीची मुदत संपल्याचे सांगितले. बालकांची प्रकृती आणखी बिघडत असल्याने सुब्बई येथून पाच किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) येथील डॉक्टरांना भ्रमणध्वनी करून बालकांवर उपचार करण्यास सुब्बई येथे येण्याची विनंती करण्यात आली. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती धुडकावून देत सुब्बई येथे येण्यास चक्क नकार दिला. बालकांना ताप, हगवण, उलट्या सुरु आहेत. अखेर पालकांनी स्वत:च आपल्या पाल्यांना राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे. साई तन्नीरवार, श्वेता नंदीगमवार, बाली बोटपल्ले सर्व रा. सुब्बई या मदरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून गांभीर्याने चौकशी करण्यात यावी व अत्यंत बेजबाबदारपणे चिमुकल्या बालकांना मुदतबाह्य औषधी देऊन त्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर) वैद्यकीय अधिकाऱ्याकडूनही दखल नाहीआरोग्यसेविका मुख्यालयी नाहीसुब्बईसह राजुरा तालुक्यातील अनेक आरोग्यसेविका व वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे सुब्बईसारखी एखादी अनुचित घटना घडली तर वेळेवर उपचार होऊ शकत नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशीही मागणी यानिमित्ताने पालकांनी व नागरिकांनी केली आहे. इतर अंगणवाडीमध्येही असाच प्रकारजंतुसाठी देण्यात येणाऱ्या औषधींचा पुरवठा करताना त्याच मुदतबाह्य औषधींचाच पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सुब्बईतील आणखी दोन अंगणवाडी व इतर अंगणवाडीमध्येही असाच प्रकार घडल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे.