चंद्रपूर : फार्मसी आणि पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन फेब्रुवारी महिन्यामध्ये संपली. आता नियोजित वेळापत्रकाप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्चच्या शेवटच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे टेन्शन वाढले असून अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
यावर्षी कोरोना व लाॅकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया उशिराने झाली. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेपासून सर्वच उशिराने झाले. दरम्यान, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र यामध्ये पाहिजे तसा सहभाग विद्यार्थ्यांनी घेतलाच नाही. परिणामी तोंडावर परीक्षा असताना, अभ्यासाशिवायच परीक्षा देण्याची वेळ आता विद्यार्थ्यांवर आली आहे. यामध्ये पाॅलिटेक्निक आणि फार्मसिच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी जूनमध्ये सुरू होणारे शैक्षणिक सत्र अद्यापही पाहिजे तसे सुरूच झाले नाही. आता ५ ते १२ वीचे वर्ग सुरू आहे. तर महाविद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाइन अभ्यासक्रम घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून हा विषय गेला आहे. त्यामुळे आता एक महिन्यावर आलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करवा लागणार आहे.
जिल्ह्यात फार्मसीचे ५ काॅलेज आहे. यामध्ये चंद्रपूर तसेच ब्रह्मपुरीचा समावेश आहे. या काॅलेजमध्ये ऑडमिशन झाल्या आहेत. मात्र शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना सतावत आहे.
--
बाॅक्स
अर्ज भरणे सुरू
प्रवेश प्रक्रिया अनेक दिवसांपर्यंत चालली. आता परीक्षेचे अर्ज भरणे सुरू आहे. त्यामुळे काॅलेज सुरू होण्यापूर्वीच परीक्षा घेणार काय, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण न होताच परीक्षा घेतली तर नापास होण्याची विद्यार्थ्यांना भीती आहे.
जिल्ह्यातील पाॅलिटेक्निक, फार्मसी काॅलेज
पाॅलिटेक्निक काॅलेज - ८
प्रवेश घेतलेले विद्यार्थी- ३,६००
फार्मसी काॅलेज - ७
प्रवेश घेतलेले विद्यार्थी-५६९
--
विद्यार्थी काय म्हणतात
ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी अजून काॅलेजमध्ये शिकविणे सुरू व्हायचे आहे. त्यामुळे लगेच परीक्षा झाली तर पेपर सोडविताना अडचण निर्माण होईल. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलवून परीक्षा उशिराने घेतल्या तर विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
- नीलेश रहांगडाले
चंद्रपूर
--
ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी प्रॅक्टिकल अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे जोपर्यंत नियमित काॅलेज सुरू होणार नाही तोपर्यंत परीक्षा घेण्याची घाई करू नये, नाहीतर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल.
- पराग देवतळे
चंद्रपूर
-
कोट
ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांसाठी नवीन नाही. या परीक्षेचा विद्यार्थ्यांना सरावसुद्धा आहे. यावर्षी ऑनलाइन अभ्यासक्रमसुद्धा घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी न करता बिनधास्त परीक्षा द्यावी.
- डाॅ. अनिल पावडे
प्रभारी प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, ब्रह्मपुरी
कोट
दरवर्षीप्रमाणेच यावेळीसुद्धा ऑनलाइन आणि ऑब्जेेक्टिव स्वरूपात प्रश्न राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारी करण्यास फारसी अडचण नाही. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लास सुरू होते. त्यामुळे यातूनही अधिकाधिक अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे. काळजी न करता विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे परीक्षा द्यावी. - डाॅ. सचिन दुधे
महाराष्ट्र इन्स्टीट्यूट फार्मसी, ब्रह्मपुरी