पाच वर्षांनंतर सुरू झाले काम : मात्र पहिल्याच दिवशी बंद
भद्रावती : गेल्या पाच वर्षांनंतर उत्खनन सुरू झालेल्या बरांज कोळसा खाणीचे काम पहिल्याच दिवशी प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले.
बुधवारी सकाळी ९ वाजता बरांज खाणीमध्ये उत्खननाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु, याची परवानगीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने बरांज खाणीला उत्खननाची परवानगी देत असताना चेकबरांज व बरांज मोकासा येथील ग्रामपंचायतीला न विचारता आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त गावकरी आणि कामगार यांना विश्वासात न घेता ही परवानगी दिली. त्यांनतर बुधवारी सकाळी ओ. बी. उचलण्याचे काम सुरू झाले. याच विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त गावकरी, शेतकरी व कामगार यांच्यातर्फे ओ. बी. उचलण्याचे काम सुरू असताना बंद पाडण्यात आले. सदर काम बंद पाडल्यावर कंपनी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.
बॉक्स
एसडीओंकडे तातडीची बैठक
पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने स्थानिक प्रकल्पग्रस्त गावकरी, शेतकरी व कामगार यांची उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली. सदर काम बंद पाडताना सरपंच मनिषा ठेंगणे, उपसरपंच भुक्क्या, प्रकल्पग्रस्तांतर्फे प्रवीण ठेंगणे, संजय ढाकणे, प्रवीण बोढाले, मनोहर बोढाले, विठ्ठल बोढाले, संतोष घुगुल, मंगेश पालकर, सुधीर बोढाले, संजय निखाडे, बंडू बोढाले व इतर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.