लोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : येथे स्व. किशोर इटनकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भागरथाबाई इटनकर यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात शेतकरी व शेतमजुरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन सुभाष ताजणे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती अनकेश्वर मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या गेडाम, संजीवनी धांडे, शकुंतला इटनकर, दिलीप खैरकर, सुभाष हरणे, महादेव वाघमारे, नामेदव टोंगे, बबनराव परसुटकर, रमेश लिंगमपल्लीवार, शंकर गिरडकर, पांडुरंग साळवे, वामन गौरकार आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी शेतीविषयी मार्गदर्शन केले. तसेच शेती करताना कोणत्याही एकाच पिकांवर अवलंबून न राहता पर्यायी उत्पन्न घ्यावे, त्यामुळे एखाद्या हंगामाला तोटा झाल्यास त्याची भरपाई दुसऱ्या लागवडीमध्ये भरून निघेल, असा सूर व्यक्त करण्यात आला.यावेळी उत्कृष्ठ शेतकरी म्हणून अॅड. बंडू खनके बामणी, अनिल टोंगे विसापूर, अनिल वडस्कर विसापूर तर उत्कृष्ट शेतमजूर म्हणून विठोबा आभारे विसापूर, प्रभाकर खामणकर विसापूर, जगदीश खोबरे, विसापूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी राकेश टोंगे, गणेश कौरासे, प्रितम इटनकर, रोहित पादे, प्रवीण इटनकर, सचिन कौरासे, सुरेश इटनकर, दीपक कौरासे, सचिन पिंपळकर, विजय इटनकर, किरण इटनकर, अर्चना इटनकर आदी उपस्थित होते.
विसापुरात उत्कृष्ट शेतकरी व मजुरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:14 AM