अमलनाला येथे हजारो पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात. तरुण मंडळीचा कल तर खूप मोठ्या प्रमाणावर असतो. त्याचा उत्साह ओतप्रोत होत असल्याने एक महिन्याच्या कालावधीत तीन तरुण मुलांचा जीव गेला आहे.
बॉक्स
वेस्ट वेअर जीवघेणा स्टंट
अमलनाला धरण ओवरफ्लो झाले असून अति उत्साही तरुणाची या ठिकाणी रोजची गर्दी असते. झिकझाक पद्धतीने करण्यात आलेल्या या सिमेंटचा बांधावर चडून अनेक तरुण पोहताना दिसतात तर काही तरुण बांध टाकलेल्या ठिकाणावरून खाली उडी मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचा हा जीवघेणा स्टंट तरुण पर्यटकांच्या अंगलट येत आहे.
बॉक्स
सेल्फी व फोटोचा नादात जावू शकतो जीव
अमलनाला वेस्ट वेअर ओसंडून वाहत आहे. या वाहणाऱ्या पाण्याला काही अंतरावर रोखले असून त्या खाली पाण्याचा प्रवाह अधिक आहे. पर्यटक तिथे वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत आहे. परंतु काही पर्यटक आपला जीव मुठीत घेऊन सेल्फी घेत आहे तर चांगला फोटो कसा येईल, या नादात रिक्स घेऊन अधिक प्रवाह असलेल्या ठिकाणी जाऊन फोटो काढत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
पोलीस व वनविभागाने लक्ष देण्याची गरज
अमलनाला वेस्ट वेअर येथे रोज हजारो पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेण्याकरिता या ठिकाणी येतात. पोलीस विभागाचा एक कर्मचारी उपस्थित असला तरी हजारो पर्यटकांना तो हाताळू शकत नाही. त्यामुळे अधिक पोलीस बल नेमण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच वन विभागानेही आपले कर्मचारी नेमून पर्यटकांना सुरक्षा कवच देणे गरजेचे आहे.